कोरोना महामारी येण्यापूर्वी अनेक सरकारी शाळा या बंद होण्याच्या मार्गावर होत्या. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर मात्र ही स्थिती बदलली असून पालकांचा कल सरकारी शाळांकडे अधिक दिसून येत आहे. राज्यात सरकारी शाळांमध्ये मुलांची संख्या साडेनऊ टक्क्यांनी तर, देशपातळीवर सहा टक्क्यांनी वाढली आहे. पालकांकडून सरकारी शाळांना अधिक पसंती मिळत आहे. असे, असर’ या अहवालातून हे स्पष्ट झाले.
सरकारी शाळांमध्ये वाढती पटसंख्या
सरकारी शाळांमध्ये वाढलेल्या पटसंख्येला शहरी भागातून ग्रामीण भागाकडे स्थलांतर, कोरोनाकाळातील अर्थकारण, उत्पन्नात झालेली घट तसेच मुख्य बाब म्हणजे खासगी शाळांच्या फी वाढ यांमुळे सरकारी शाळांमध्ये पालकांचा कल वाढत चालला आहे. देशपातळीवर खासगी शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३२.५ टक्क्य़ांवरून २४.४ टक्क्य़ांपर्यंत कमी झाले आहे. त्यातही मुलांच्या तुलनेने मुलींना शासकीय शाळेत दाखल करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते.
( हेही वाचा : धक्कादायक! भारत धूम्रपानात जगात दुसऱ्या स्थानी! )
कोरोनानंतर चित्र पालटले
कोरोनानंतर देशभरातील सरकारी शाळांमधील परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. २०१८ च्या तुलनेत यंदाच्या सर्वेक्षणानुसार कोरोना काळात अर्थकारणामुळे अनेक खासगी शाळा बंद झाल्या तर, अनेकांनी नोकऱ्या गमावल्यामुळे सरकारी शाळांना सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत.
Join Our WhatsApp Community