Premarital Communication Center: मुंबईत तीन ठिकाणी ‘तेरे मेरे सपने’; विवाहपूर्व संवाद केंद्रांची स्थापना

119
मुंबई प्रतिनिधी : 
Premarital Communication Center : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र, वाढत्या कौटुंबिक वाद आणि घटस्फोटांच्या प्रकरणांमुळे विवाहपूर्व सल्लामसलत आणि संवाद केंद्रांची (Communication Center) गरज निर्माण झाली आहे. याच उद्देशाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) मार्गदर्शनाखाली आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सहयोगाने, भारतीय स्त्री शक्ति संस्थेतर्फे (Indian Women’s Shakti Society) मुंबईत तीन ठिकाणी ‘विवाहपूर्व संवाद केंद्र’ सुरू केली जाणार आहेत. (Premarital Communication Center)

(हेही वाचा – MMRDA : झोपडपट्टी वासियांसाठी बनविण्यात आलेल्या संकलन शिबिरात बेकायदेशीर कब्जा )

परळ, विलेपार्ले आणि बोरीवली येथे केंद्रे सुरू होणार
या केंद्रांचे उद्घाटन ८ मार्च २०२५ रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women’s Day) करण्यात येणार आहे. परळ, विलेपार्ले आणि बोरीवली या ठिकाणी ही केंद्रे कार्यान्वित होणार असून, येथे विवाहपूर्व सल्लामसलत, (Premarital counseling) संवाद आणि मार्गदर्शन दिले जाईल.
विवाहपूर्व संवाद केंद्रांची गरज का?
आजच्या काळात कौटुंबिक वाद आणि घटस्फोटाचे (Divorce) प्रमाण वाढत आहे. फॅमिली कोर्टामध्ये तरुण जोडप्यांतील मतभेद आणि वेगळे होण्याचे प्रकरण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. याला आळा घालण्यासाठी विवाहपूर्व संवाद केंद्र आवश्यक आहेत, जेणेकरून विवाहबंधन अधिक सुदृढ आणि टिकाऊ होईल.
राष्ट्रीय महिला आयोगाचा पुढाकार
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी अशा विवाहपूर्व संवाद केंद्रांची संकल्पना मांडली असून, देशभरात ही केंद्रे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

(हेही वाचा – मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची विधानसभेत ग्वाही)

भारतीय स्त्री शक्ति – महिला व कुटुंब सशक्तीकरणासाठी कार्यरत
भारतीय स्त्री शक्ति ही संस्था १९८८ पासून महिलांच्या आणि कुटुंबांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेतर्फे विवाहपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा, कुटुंब सल्ला केंद्रे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
केंद्रांमधून कोणत्या सेवा मिळणार?
  • विवाहपूर्व मार्गदर्शन व समुपदेशन
  • कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यासाठी संवाद तंत्रावर मार्गदर्शन
  • संघर्ष व्यवस्थापन आणि वैवाहिक जीवनातील अपेक्षा समजून घेण्यास मदत
  • समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या भेटी
भारतीय स्त्री शक्तीच्या पदाधिकारी सीमा देशपांडे यांनी सांगितले की, विवाहपूर्व मार्गदर्शन आणि संवाद वाढविण्याच्या या उपक्रमामुळे वैवाहिक आयुष्य अधिक समतोल आणि यशस्वी होण्यास मदत होईल.

(हेही वाचा – Jio-Star Layoff : जिओ स्टारमधून १,१०० लोकांची गच्छंती अटळ)

स्त्री-पुरुष संबंध अधिक सशक्त करण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम
या केंद्रांच्या माध्यमातून विवाहपूर्व सल्लामसलत, समुपदेशन आणि संवाद वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे भावी पती-पत्नींना एकमेकांच्या विचारांची समज आणि परस्पर सहकार्याची मानसिकता तयार करण्यास मदत होईल. ८ मार्च २०२५ पासून सुरू होणाऱ्या या केंद्रांमुळे विवाह संस्थेचे बळकटीकरण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.