अनेक दशकांपासून, जर एखाद्याला मुंबईचे चित्र रेखाटायचे असेल, तर शहरातील ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सीशिवाय (Premier Padmini Taxi) ती प्रतिमा अपूर्ण राहिली असती. कारण, लाडाने ‘काली-पीली’ म्हणून ओळखली जाणारी मुंबईच्या रस्त्यावर धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी आता लवकरच बंद होणार आहे. गेली 60 वर्षे मुंबईच्या रस्त्यावर ही काळी पिवळी धावत होती.
प्रीमिअर पद्मिनी (Premier Padmini Taxi) कंपनी बंद झाली असून आता मात्र उद्यापासून म्हणजेच सोमवार 30 ऑक्टोबर पासून ह्या टॅक्सीचे मीटर डाऊन होणार आहे. पद्मिनी टॅक्सित ऐसपैस जागा ,स्टेअरिंगला गियर, समोरून आणि मागून सुरक्षित असलेली ही टॅक्सी बंद होत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतसुद्धा या टॅक्सीने मानाचे स्थान मिळवले होते.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार कोणती भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…)
वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शेवटची (Premier Padmini Taxi) प्रीमियर पद्मिनी 29 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई बेटावरील शहरावर अधिकारक्षेत्र असलेल्या तारदेव आरटीओमध्ये काळ्या आणि पिवळ्या रंगाची टॅक्सी म्हणून नोंदणीकृत होती. शहरातील टॅक्सीसाठी वयोमर्यादा ही 20 वर्षे असल्याने, सोमवारीपासून मुंबईत अधिकृतपणे प्रीमियर पद्मिनी टॅक्सी नसेल.
“ये मुंबई की शान है और हमारी जान है (हा मुंबईचा आणि माझ्या जीवनाचा अभिमान आहे)”, एमएच-01-जेए-2556 नोंदणी क्रमांक असलेली मुंबईतील शेवटची नोंदणीकृत प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचे (Premier Padmini Taxi) मालक असलेले प्रभादेवी रहिवासी अब्दुल करीम करसेकर म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community