- विशेष प्रतिनिधी, मुंबई
चेंबूरच्या विवेकानंद महाविद्यालयात श्री हशुजी अडवाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत (Speech Competition) महात्मा फुले महाविद्यालयाचा प्रेमनाथ पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. तर विवेकानंद महाविद्यालयाच्या दिव्या वर्तक यांनी द्वितीय‚ विद्यालंकार महाविद्यालयाच्या सुमित शर्मा यांनी क्रमांक पटकावला.
मागील २३ जानेवारी २०२५ रोजी चेंबूरच्या विवेकानंद महाविद्यालयात श्री हशुजी अडवाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे (Speech Competition) आयोजन केले होते. स्पर्धेचे हे ३ रे वर्ष होते. महाविद्यालयीन युवकांना आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे व याच वक्तृत्वातून पुढे कर्तृत्त्ववान नेतृत्व जन्माला यावे हे उद्दिष्ट मनाशी ठेवून ३ वर्षांपासून ही स्पर्धा अविरत सुरू आहे.
(हेही वाचा – जीबीएस आजाराबाबत सरकार सतर्क; सार्वजनिक आरोग्य मंत्री Prakash Abitkar यांचे प्रतिपादन)
दरवर्षीप्रमाणे संपूर्ण राज्यातून या स्पर्धेला (Speech Competition) स्पर्धेकांचा प्रतिसाद लाभला. पुणे, नाशिक‚ रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे‚ मुंबई व मुंबई उपनगर इत्यादी जिल्ह्यातील स्पर्धकांनी विवेकानंद महाविद्यालयात हजेरी लावली होती. या स्पर्धेत परिक्षक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका पूनम चांदोरकर, के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. स्मिता परांजपे तसेच निर्मला निकेतन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका विभूती खेडेकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाचा प्रेमनाथ पाटील याने प्रथम क्रमांक तर विवेकानंद महाविद्यालयाच्या दिव्या वर्तकला द्वितीय‚ विद्यालंकार महाविद्यालयाच्या सुमित शर्माला तृतीय तर आद्या किरकिंदे व नम्रता दिवटे यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सदर स्पर्धा (Speech Competition) महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता कन्वर उपप्राचार्या रितिका मक्खीजानी व शमिथा शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर स्पर्धेच्या समन्वयिका डॉ. साधना सिंग यांनी सर्वांचे आभार मानले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community