सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! प्रिपेड टॅक्सीचे भाडे वाढले; जाणून घ्या नवे दर…

मुंबई विमानतळावरील काळ्या-पिवळ्या प्रिपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रिपेड टॅक्सीने जाण्यासाठी आता सहा किलोमीटर अंतरापर्यंत यापूर्वी १२७ रुपये, तर देशांतर्गत विमानतळावरून चार किलोमीटर प्रवासासाठी ८५ रुपये मोजावे लागत आहे. आता या प्रिपेड टॅक्सी भाड्यात वाढ करण्यात आली आहे.

( हेही वाचा : दिवसभर फिरा केवळ 40 रुपयांत; पुणेकरांची लाईफलाईन PMPML ची योजना)

आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रिपेड टॅक्सीने किमान सहा किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी आता १४० रुपये, तर देशांतर्गत विमानतळाबाहेरून या टॅक्सी चार किलोमीटर अंतरासाठी ९३ रुपये मोजावे लागणार आहेत.

नवे दर

  • ६ किलोमीटर – १४० रुपये
  • १६ किलोमीटर – ३५८ रुपये

टॅक्सीवर रुपलाईट इंडिकेटर बसविणे सक्तीचे करण्यात आले होतो. मात्र इंडिकेटर बसविण्याच्या निर्णयाला एमएमआरटीएने ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रवाशांना काळ्या – पिवळ्या टॅक्सीची उपलब्धता समजावी यासाठी रुपलाईट इंडिकेटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • हिरवा रंग – टॅक्सी उपलब्ध
  • पांढरा रंग – टॅक्सी बंद
  • लाल रंग – टॅक्सी उपलब्ध नाही

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here