गुजराती साहित्य टिकवणे काळाची गरज; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचे विधान

चित्रलेखाच्या ७५व्या वर्धापनदिनी गौरव

30
गुजराती साहित्य टिकवणे काळाची गरज; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचे विधान
  • प्रतिनिधी

इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावाच्या काळात गुजराती साहित्य टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ठामपणे सांगितले. चित्रलेखा साप्ताहिकाने गेली ७५ वर्षे गुजराती साहित्य आणि समाजप्रबोधनाचे कार्य अविरतपणे केले आहे. “चित्रलेखा केवळ गुजराती समाजजीवनाचेच नव्हे, तर देशातील समस्यांचे प्रतिबिंब मांडते. समस्या उपस्थित करून थांबण्याऐवजी त्यांच्या निराकरणाचे मार्गही दाखवते,” असे गौरवोद्गार शाह यांनी काढले.

(हेही वाचा – Dead Body : शवागृहातील ७५ बेवारस मृत आत्म्यांना मिळणार मुक्ती; कशी वाचा)

चित्रलेखाच्या ७५व्या स्थापनादिनानिमित्त मुंबईत आयोजित समारंभात शाह (Amit Shah) बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अभिनेत्री सरिता जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शाह (Amit Shah) यांनी सांगितले, “मी येथे गृहमंत्री म्हणून नाही, तर चित्रलेखाचा सामान्य वाचक म्हणून आलो आहे. आयुष्यात तीन घरे बदलली, फर्निचर आणि माणसे बदलली, पण चित्रलेखाचे स्थान कायम आहे. आजही माझी नात हे साप्ताहिक जपते.” त्यांनी चित्रलेखाच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की, एम. के. गांधींनी १९१९ मध्ये ‘नवजीवन’ सुरू केले, तेव्हापासूनच गुजराती नियतकालिके समाजप्रबोधन करत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यासारखी साहित्यकृती चित्रलेखातूनच प्रथम प्रकाशित झाली. तारक मेहता यांच्यासह चित्रलेखाच्या तीन पत्रकारांना पद्म पुरस्कार मिळाले, ही बाब अभिमानास्पद आहे.

(हेही वाचा – Dr. Babasaheb Ambedkar जयंतीनिमित्त १४ व १५ एप्रिल रोजी टूर सर्कीटचे आयोजन; शंभूराज देसाई यांची माहिती)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चित्रलेखाचे कौतुक केले. “गेल्या ३० वर्षांपासून मराठी चित्रलेखाने मराठी वाचकांच्या मनात स्थान मिळवले आहे. आता मराठी चित्रलेखाची ई-आवृत्ती तरी सुरू व्हावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “माझे गुजराती ‘केम छो’पुरते मर्यादित आहे, पण मला गुजराती उत्तम समजते,” असे सांगत त्यांनी वातावरण हलके केले. यावेळी महाराष्ट्रातील विकासकामांचा आढावा घेणारी चित्रफीतही दाखवण्यात आली. चित्रलेखाने ७५ वर्षे गुजराती साहित्य आणि संस्कृती जपली असून, मराठी वाचकांनाही जोडले आहे. या समारंभाने साहित्य आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रातील चित्रलेखाच्या योगदानाला उजाळा मिळाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.