President Draupadi Murmu : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

योगाच्या अमूल्य ज्ञानाचा आपल्या मुलांना आणि आपल्या तरुण पिढीला फायदा व्हायला हवा या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान परंपरेत असलेल्या योग ज्ञानाला शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

226
President Draupadi Murmu : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
President Draupadi Murmu : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी मानली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवार (२९ नोव्हेंबर) येथे केले.लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेचा शताब्दी सोहळा आणि ‘शालेय शिक्षणात योगाचे एकत्रीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रपती श्रीमती मुर्मू बोलत होत्या. (President Draupadi Murmu)

कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री तथा शताब्दी समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारी, सचिव सुबोध तिवारी आदी उपस्थित होते.स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेल्या ‘कैवल्यधाम’च्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून आनंद झाला, असे सांगून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या, भारताचे योग शिक्षण ही जागतिक समुदायासाठी आपली अमूल्य देणगी आहे.

आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन
भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. योग प्रणाली ही आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करते आणि ती संपूर्ण जागतिक समुदायाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा : NCP Hearing : शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; शरद पवार गटाचे विविध दाखले आयोगापुढे सादर)

योग ज्ञानाला शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान
त्या पुढे म्हणाल्या, योगाच्या अमूल्य ज्ञानाचा आपल्या मुलांना आणि आपल्या तरुण पिढीला फायदा व्हायला हवा या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान परंपरेत असलेल्या योग ज्ञानाला शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. प्राचीन भारतातील गुरुकुलमध्ये शिकणारे विद्यार्थी, बौद्धिक ज्ञान तसेच आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असत. आपल्या विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन परंपरेच्या उपयुक्त घटकांशी जोडणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.