रणजीत सावरकरांच्या हस्ते वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन!

138

लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धीतर्फे वैद्यकीय शिबीर सांताक्रूझ पूर्वेला आयोजित करण्यात आले होते. या क्लबचे चार्टर्ड प्रेसिडंट सुहास नार्वेकर याच्या नेतृत्वाखाली या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सांताक्रूझमधील गरीब आणि गरजू  लोकांच्या तपासणीसाठी या वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तसेच विशेष पाहुणे म्हणून सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपअधिक्षक विजय खैरे आमंत्रित होते.

‘इतके’ लाभार्थी

या वैद्यकीय शिबिराचा अनेक गरीब लोकांनी लाभ घेतला आहे. या वैद्यकीय शिबिरात जवळजवळ  250 लोकांची तपासणी करण्यात आली. 120 लोकांनी दातांची तर 218 लोकांनी डोळ्यांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान 6 जणांना कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यातील तीन जणांवर लायन्स क्लब मोफत उपचार करणार आहे. तर आणखी तीन जणांना क्लबतर्फे मदत केली जाणार आहे.

( हेही वाचा: #Factcheck बुरखाधारी महिलांवर गटाराचे पाणी ओतणारी ‘ती’ मुले कोणती? व्हायरल व्हिडिओमागील सत्य )

‘हा’ होता उद्देश

सांताक्रूझमधील गरीब आणि गरजू लोकांना आरोग्याच्यादृष्टीने मदत व्हावी, या उद्देशाने या वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन डेंटल असोसिएशन यांच्याकडून चार डाॅक्टर देण्यात आले. त्वचा आणि जनरल विभागाचे डाॅ. प्रसाद खुटाडे, तसेच जनरल डाॅ. धनंजय कुलकर्णी, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि जनरल डाॅ. माधूरी कुलकर्णी, डाॅ. जय आजगावकर हे डाॅक्टर्स लायन्स ग्रुपतर्फे होते.

या पाहुण्यांची उपस्थिती

रणजीत सावरकर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धीचे चार्टर्ड प्रेसिडंट सुहास नार्वेकर, सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपअधिक्षक विजय खैरे आणि लायन्सचे  चेअरमन सीमा अग्रवाल यावेळी उपस्थित होत्या.

मदतीचा हात

यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी स्मारकात होणा-या लाईट अॅण्ड साउंड या  कार्यक्रमासाठी लायन्स क्लबला आमंत्रित केले. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आर्थिक मदत करता आली, तर ती करणार असल्याचेही रणजीत सावरकर यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.