शैक्षणिक संस्था म्हणजे सुप्त कलागुणांना नवी झळाळी देणारे ठिकाण – राष्ट्रपती

79

शैक्षणिक संस्था या केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे, तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना पैलूसंस्थेच्या स्थायी परिसराचे उद्घाटन पाडत नवी झळाळी देणारे ठिकाण असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. नागपूरच्या मिहान, दहेगाव मौजा इथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात भारतीय व्यवस्थापन  करताना ते रविवारी बोलत होते. अभ्यासक्रम हा आपल्याला आपले ध्येय, महत्वाकांक्षा याबाबत आत्मपरीक्षणाची संधी देत आपल्या स्वप्नांची पूर्तता करतो, असे राष्ट्रपती म्हणाले.

नवोन्मेश आणि उद्योजकता यांना प्रशंसेची पावती देत प्रोत्साहन देणाऱ्या युगात आपण राहत आहोत. नवोन्मेश आणि उद्योजकता या दोन्हीतही, तंत्रज्ञानाद्वारे आपले जीवन अधिक सुकर करण्याची क्षमता तर आहेच त्याचबरोबर अनेकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याचेही सामर्थ्य आहे. आयआयएम नागपूर इथली परिसंस्था, रोजगार मागणारे ऐवजी रोजगार पुरवणारे होण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी प्रोत्साहन देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला सबलीकरणासाठी प्रभावी मंच

आयआयएम नागपूरने, आपल्या उद्योजकता केंद्राद्वारे आयआयएम नागपूर फाऊंडेशन फॉर इंट्राप्रेनरशिप  डेव्हलपमेंट (InFED) उभारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इनफेडने महिला स्टार्टअप कार्यक्रमातून महिला उद्योजकांना यशस्वी पदवीधारक होण्यासाठी सक्षम केल्याची बाब निश्चितच अभिमानास्पद असल्याचे, सांगून त्यापैकी सहा जणींनी उद्योगाचा प्रारंभ केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. असे कार्यक्रम, महिला सबलीकरणासाठी प्रभावी मंच पुरवतात.

( हेही वाचा: सरळसेवा भरतीसंदर्भात होणार पुढील आठवड्यात निर्णय; शरद पवारांचे आश्वासन )

राष्ट्रपतींनी केले नागपूरचे अभिनंदन

कोणतीही गोष्ट परस्परांमध्ये वाटून घेण्याच्या, विशेषकरून ज्ञान क्षेत्रात आपल्याकडचे ज्ञान इतरांनाही देण्यावर आपल्या संस्कृतीचा नेहमीच भर राहिला आहे. म्हणूनच आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सर्वांना देणे हे आपले कर्तव्य आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. आयआयएम अहमदाबादने ज्याप्रमाणे नागपूर आयआयएमसाठी मार्गदर्शन पुरवले आहे, त्याचप्रमाणे देशातल्या तंत्र, व्यवस्थापन क्षेत्रातल्या अग्रगण्य व्यावसयिक शिक्षण देणाऱ्या संस्था अशाच संस्थांच्या उभारणीसाठी मार्गदर्शन पुरवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्ञान दान केल्याने, दुसऱ्याला दिल्याने  ज्ञानाची वृद्धी होते, असे राष्ट्रपती म्हणाले. पुणे, हैदराबाद आणि सिंगापूर इथे उपग्रह परिसर उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयआयएम नागपूरचे अभिनंदन केले.

विदर्भातल्या उद्योग जगताशी समन्वय ठेवावा

आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की नागपूरला शैक्षणिक, वैद्यकीय आणि लॉजिस्टिक्स केंद्र करण्याचे स्वप्न आम्ही साकार करत आहोत. नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आय. आय. एमने सहाय्य करावे. आय. आय. एमने विदर्भातल्या उद्योग जगताशी समन्वय ठेवावा. विदर्भात, खनिज संसाधने, वने आणि वन्य जीव पर्यटन यामध्ये विपुल संधी उपलब्ध आहेत, असावे ते म्हणाले.

जागतिक नेते घडवण्याचा वारसा या संस्थेकडे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, NEP 2020 च्या अनुषंगाने आयआयएम नागपूरने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताला रोजगार निर्माण करणारे राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी नवीन मार्ग विकसित केले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये समाजाला परत देण्याची भावना रुजवण्याचे आवाहन करत प्रधान म्हणाले, ‘आयआयएमएनने विदर्भातील अविकसित भागातील  शाळा दत्तक घ्यावी आणि क्षमता निर्मिती कार्यक्रमांद्वारे तिचा कायापालट करण्याचे ध्येय बाळगायला हवे. ‘आयआयएम नागपूरचे प्राध्यापक आणि विद्यार्थीदेखील या विद्यार्थ्यांना शिकवू शकतील आणि त्यांना प्रोत्साहन देऊ शकतील’, असे ते म्हणाले. लोक आयआयएम नागपूरला भेट देऊन नागपूरचे भविष्य पाहण्यासाठी येतील. भविष्यातील जागतिक नेते घडवण्याचा वारसा या संस्थेकडे असेल अशी भावना आयआयएम नागपूरच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी यांनी व्यक्त केली. आयआयएम नागपूरला मिहान  येथील जागेत जाण्यापूर्वी  व्ही.एन.आय. टी. ने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभारही मानले.

आयआयएम कॅम्पसच्या भेटीदरम्यान, आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी राष्ट्रपतींना कॅम्पसच्या पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली.  याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, आयआयएम नागपूरचे अध्यक्ष सी.पी. गुरुणानी, संचालक डॉ. भीमराया मैत्री, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयआयएम नागपूरविषयी

आयआयएम नागपूरच्या 132 एकरावरच्या परिसरात पहिल्या टप्प्यात 600 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची क्षमता आहे. यामध्ये 20 हाय-टेक खोल्या आहेत, 24 प्रशिक्षण आणि सेमिनार सभागृह आहेत. तसेच 400 आसन क्षमता असलेले संमेलन सभागृह आहे. आयआयएम नागपूरची पायाभरणी 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.