कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्राॅम होम ही संकल्पना उदयाला आली. वर्क फ्राॅम होममुळे कोरोना काळात ब-याच गोष्टी सुलभ झाल्या. पण, सोबतच ज्या महिला नोकरी करतात त्यांच्यावर आधी नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी होती, पण आता मात्र तिच जबाबदारी तिहेरी झाली आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगत, चिंता व्यक्त केली आहे. मनोरमा ईयरबुक २०२२ मध्ये त्यांनी तरुणांना लिहिलेलं एक पत्र प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यात राष्ट्रपतींनी याचा उल्लेख केला आहे.
ईयरबूकमध्ये राष्ट्रपतींनी तरुणांना लिहिले पत्र
“अराइज, द फ्यूचर बेकोन्स” या शीर्षकाखाली लिहलेल्या पत्रात राष्ट्रपती म्हणतात, घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना महिला आधीच दुहेरी भार सहन करत आहेत. त्यात मुलं आता घरुनच शिक्षण घेऊ लागली आहेत, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी दोघांची असते, पण इथे शिकवण्याची जबाबदारीही मातांवर टाकली जाते. अशा परिस्थितीत पुरुषांनी कुटुंबातील जबाबदारी वाटून घेतली पाहिजे.
( हेही वाचा :राज्यपाल आणि ठाकरे सरकारच्या संघर्षाचे पोलीसही ठरलेत बळी!)
Join Our WhatsApp Community