Droupadi Murmu यांनी प्रयागराज येथे केले संगमस्नान; कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

Droupadi Murmu या देशाच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत, ज्यांनी महाकुंभपर्वात केले गंगास्नान

107

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी सोमवार, १० फेब्रुवारी या दिवशी प्रयागराज येथे महाकुंभक्षेत्री भेट देऊन महाकुंभात पोहोचल्या. त्यांनी संगमस्नान केले, तसेच सूर्याला अर्घ देऊन गंगापूजनही केले. यानंतर गंगेची आरती करण्यात आली. गंगापूजन झाल्यानंतर त्यांनी प्रयागराज येथील प्राचीन अक्षयवट आणि लेटे हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतील. राष्ट्रपतींसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यादेखील उपस्थित होत्या. (Prayagraj Kumbh Mela 2025)

(हेही वाचा – CM Fadnavis Raj Thackeray Meet : भाजपा-मनसे एकत्र येणार; राजकीय समीकरणे बदलणार ?)

१० फेब्रुवारी हा महाकुंभाचा २९ वा दिवस आहे. १३ जानेवारीपासून ४३.५७ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत ६३ लाख लोकांनी स्नान केले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही त्यांच्या कुटुंबासह त्रिवेणी संगमावर स्नान केले. तसेच सूर्यदेवाला अर्घ्य दिले.

सोमवारी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर बामरौली विमानतळावर उतरले. येथे राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. तिथून अरैलला पोहोचल्या, नंतर बोटीने संगमावर पोहोचल्या आणि गंगास्नान केले.

राष्ट्रपती संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्रयागराजमध्ये रहातील. द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत, ज्यांनी महाकुंभपर्वात गंगास्नान केले. यापूर्वी १९५४ मध्ये, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) यांनीही महाकुंभपर्वात स्नान केले होते.

प्रयागराज शहरात अभूतपूर्व गर्दी झाली आहे. प्रयागराजमध्ये येणाऱ्या ७ ही रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याशिवाय संगम स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. (Droupadi Murmu)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.