संपूर्ण देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यावर १० ग्रॅम सोन्याचा दर ६० हजारांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे.
( हेही वाचा : WPL 2023 : महिला आयपीएलचा पहिला हंगाम! ४६६९.९९ कोटींचे असे असतील ५ संघ)
सोने-चांदीच्या किंमती वधारल्या
अर्थसंकल्पानंतर गुरूवारी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार आता सोने प्रति १० ग्रॅम ५८ हजार ६८९ रुपये झाले आहे. याआधी बुधवारी सोन्याचा भाव ५७ हजार ९१० रुपये होता. तर दुसरीकडे चांदी सुद्ध तब्बल १ हजार ८०५ रुपयांनी महागली आहे. आता चांदीचे भाव ७१ हजार २५० रुपयांवर पोहोचले आहेत.
सोन्याचे भाव वाढण्यामागचे कारण?
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर करताना सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवरील सीमा शुल्क २० टक्के वरून २५ टक्के, चांदीवरील सीमाशुल्क ७.५ टक्क्यांवरून १५ टक्के वाढवण्याची घोषणा केली. यानंतर भारतीय बाजारात सोन्याच्या किमती वाढू लागल्या. २०२३ मध्ये सोन्याचे भाव ६४ हजारांपर्यंत पोहोचतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community