सोलापूर बाजार समितीत सोमवारी ३२५ तर ३३४ गाड्या कांदा (Onion) आवक नोंदविण्यात आली. यावेळी जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तर नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत सोमवारी दोन हजार ते चार हजारांपर्यंत भाव होता. पावसाने भिजलेल्या कांद्याला प्रतिकिलो १० ते १५ रुपयांचा दर मिळाला.सोलापूर बाजार समितीत सध्या नगर, नाशिक, धाराशिव, पुणे जिल्ह्यातून जुना कांदा येत आहे.
(हेही वाचा – National Film Awards : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान)
सोमवारी आवक झालेल्या ३२५ गाड्यांमध्ये २०० गाड्या जुना कांदा (Onion) होता तर १२५ गाड्या नवीन कांदा होता. मंगळवारी देखील आवक वाढली होती. म्हसवड, फलटण, माळशिरस, कर्नाटक, बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी येथून नवीन कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. आवक वाढल्याने १५ दिवसांपूर्वीचा दर सध्या राहिलेला नाही. साडेपाच हजार रुपये क्विंटलने जाणारा कांदा आता आवक वाढल्याने तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे.
(हेही वाचा – Thook Jihad : मसूरीत नौशाद आणि हसन अलीचा विकृत ‘थुंक जिहाद’, पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ)
सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा (Onion) बाजारात यायला अजून एक महिन्याचा अवधी आहे. तत्पूर्वी, दर कमी झाल्याने बळिराजाची चिंता वाढू लागली आहे. त्यातच पुन्हा शेतकऱ्याला विकलेल्या कांद्याचे बिल रोखीने मिळत नाही. किमान १५ हजार रुपयांपेक्षा जास्त बिल झाल्यास त्यांना १५ दिवसांची तारीख टाकलेला धनादेश (चेक) दिला जात असल्याची वस्तुस्थिती आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community