पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले!

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक कमी झाली असून सध्या किरकोळ बाजारात ८० ते शंभर रुपये किलोने भाज्या विकल्या जात आहेत. जुलै महिन्यापासून पावसाने विदर्भ व मराठवाड्यात हाहाकार उडविला आहे.

( हेही वाचा : महापालिका शाळांमधील मुलांना दप्तर खरेदीसाठी सुमारे ५१० ते ७६० रुपये मिळणार!)

पावसाचा भाजीपाला उत्पादनावर थेट परिणाम झाल्याने बाजारातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. टोमॅटो सोडून इतर कोणतीही भाजी ८० ते १०० रुपये किलोखाली मिळत नाही. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

नाशिक किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर

 • वांगी – ८० रुपये किलो
 • गवार – १३०-१४० रुपये किलो
 • वटाणा – १५० ते १६० रुपये किलो
 • भेंडी – ८० ते १०० रुपये किलो
 • कारले – ८० ते १०० रुपये किलो
 • मेथी – ५० ते ६० रुपये जुडी
 • वाल – ११० ते १२० किलो
 • टोमॅटो – ३० ते ४० रुपये किलो
 • बटाटा – ३० रुपये किलो
 • पालक – ४० ते ५० रुपये जुडी
 • कोथिंबीर – ९० ते १०० रुपये जुडी
 • काकडी – ५० ते ६० रुपये किलो
 • चवळी – ११० ते १२० रुपये किलो
 • घेवडा – १३० ते १४० रुपये किलो

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here