catholic priest committing sexual assault : चर्चेसमधील वासनांध पाद्र्यांचे कारनामे!

145

नुकतेच ख्रिस्ती धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी भविष्यातील पाद्री यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले होते, त्यामध्ये पोप यांनी पाद्री आणि नन हे अश्लिल  व्हिडीओ पाहतात, अशी कबुली दिली आणि याप्रकरणी खडे बोल सुनावले. यामुळे चर्चमध्ये नन, अल्पवयीन मुले-मुली यांच्यावर पाद्र्यांकडून लैंगिक अत्याचार होतो, याला पुष्टी मिळाली आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे उघडकीस येत नाहीत. आलीेच तर पोलीस त्याची दखल घेत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. पाश्‍चात्त्य देशांत गेली अनेक दशके अशा प्रकारे पाद्र्यांकडून लहान मुले, मुली, महिला, नन यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या शेकडो घटना उघडकीस आल्या आहेत. आता अशा घटना भारतातही घडत असल्याचे उघडकीस येत आहे. याविषयी पाद्र्यांना सभ्य, सुसंस्कृत समजणारे भारतीय त्यांचे खरे स्वरूप लक्षात घेतील का? याविषयी निधर्मीवादी आणि पुरोगामी बोलतील का?

परेराला पोलिसांचे समर्थन?  

पुणे येथील १३ वर्षीय शाळकरी मुलावर पाद्री विन्सेंट परेरा हे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचे. याआधीही या पाद्र्यावर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेले आहेत. या प्रकरणी पीडित मुलाच्या आई-वडिलांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली; मात्र तेथेही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. हा प्रकार येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो आणि मारुति भापकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण पुन्हा हडपसर पोलिसांकडे नेले. तेथे न्याय मिळत नाही म्हणून ते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही भेटले. तरीही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. शेवटी या सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोगा’कडे तक्रार केली. त्यानंतर जवळजवळ १० महिन्यांनंतर आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली आणि त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आणि तेथून पुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पीडित मुलाच्या आई-वडिलांनी सांगितले की, हडपसर पोलिसांच्या टोलवाटोलवीनंतर त्यांनी ४ पोलीस ठाणी आणि १ पोलीस चौकी येथे तक्रार नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विन्सेंट परेरा यांना बोलावून घेतले आणि तोंडी क्षमा मागायला लावली आणि प्रकरण मिटल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी विन्सेंट परेरा याने पीडित मुलाच्या आईवडिलांनाच धमकावल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्यातील १६ व २१ हे कठोर कलम जाणीवपूर्वक लावलेले नाही. केवळ कलम ८ च लावले. याच त्रुटीचा फायदा मिळून विकृत आरोपी परेरा याला पुणे सत्र न्यायालयातून जामीन मिळाला; मात्र लोबो आणि भापकर हे या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

(हेही वाचा विधवा महिलेला कुंकू लावण्याची मोहीम पुरोगामी ठरते, मग विवाहित महिलेला कुंकू लाव म्हटले तर धोक्यात कसे येते?)

जर्मनीत पीडितावर १ हजार वेळा अत्याचार

जर्मनीमध्ये कॅथॉलिक ननकडून चालवल्या जाणाऱ्या ‘चिल्ड्रन होम’मधील अनाथ मुलांना पाद्री, राजकीय नेते आणि व्यावसायिक यांच्याकडे लैंगिक शोषणासाठी पाठवले जात होते, असे वृत्त ‘डेली मेल’ने प्रसिद्ध केले आहे. एका ६३ वर्षीय पीडित व्यक्तीने न्यायालयात याविषयीची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. ही पीडित व्यक्ती १९६० ते १९७० या काळात या ‘चिल्ड्रन होम’मध्ये रहात होती. या वेळी त्या व्यक्तीने या चिल्ड्रन होममध्ये जो काही प्रकार चालू होता, त्याची सविस्तर माहिती दिली आहे. अन्वेषणात मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष १९४६ ते २०१४ या काळात सुमारे १ हजार ६७० पाद्र्यांनी ३ हजार ६७७ मुलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. मार्च १९६३ मध्ये जर्मनीतील स्पेयर शहरामधील ‘चिल्ड्रन होम’ मध्ये रहात होता. हे चिल्ड्रन होम ‘ऑर्डर ऑफ सिस्टर्स ऑफ दी डिवाईन सेव्हीअर’कडून चालवण्यात येत होते. या पीडित व्यक्तीने या ‘चिल्ड्रन होम’च्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. वर्ष १९६० ते १९७० या काळात ‘चिल्ड्रन होम’मध्ये तिच्यावर एक हजारांहून अधिक वेळा बलात्कार करण्यात आला, तसेच अनाथालयात रहाणाऱ्या अन्य मुलांनाही ननद्वारे पाद्री आणि नेते यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला जात होता. विरोध केल्यावर मारहाण केली जात होती. ही व्यक्ती ५ वर्षांची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. न्यायालयात या पीडित व्यक्तीने सांगितले की, लैंगिक अत्याचारांसाठी मुलांना बाहेर पाठवले जात होते. तसेच ‘चिल्ड्रन होम’ मध्येही लैंगिक अत्याचार केले जात होते. अनाथालयात एक खोली होती. तेथे पाद्री, नेते आणि अन्य लोक यांच्यासमोर ७ ते १४ वर्षांच्या मुलांना पाठवले जात होते. ते हवे तेव्हा मुलांवर बलात्कार करत होते. वर्ष १९५० पासून फ्रान्समधील चर्चच्या पाद्र्यांच्या लैंगिक शोषणाला १० हजार मुले बळी पडली असावीत, अशी माहिती अल्पवयीन मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराची चौकशी करण्यासाठी कॅथोलिक चर्चने स्थापन केलेल्या चौकशी समितीचे प्रमुख जीन-मार्क सॉवे यांनी दिली. सॉवे म्हणाले की, अमेरिका, फ्रान्स, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांसह अनेक देशांत पाद्र्यांकडून मुलांचे लैंगिक शोषण करण्यात येत आहेत. फ्रान्समध्ये वर्ष १९५० ते २०२० पर्यंत २ लाख १६ हजार पीडितांवर या काळात पाद्र्यांकडून अत्याचार झाला होता. गरीब देशांतील स्थिती तर आणखी वाईट आहे. या देशांतील अशा बहुतेक गुन्ह्यांची नोंदच होत नाही. हिंदू संतांवर जेव्हा कथित महिला अत्याचाराचे आरोप होतात, तेव्हा हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सगळी शक्ती एकवटणारे निधर्मीवादी आणि पुरोगामी ख्रिस्ती धर्मातील चर्चमध्ये होत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांकडे का दुर्लक्ष करतात?

नवी मुंबईत चर्चचा आश्रमशाळेत लैंगिक अत्याचार

ऑगस्ट २०२२ मध्ये नवी मुंबई येथील ‘सी वूड’ परिसरातील एका संस्थेच्या विरोधात चर्चमध्ये अवैध आश्रमशाळा चालवल्याप्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईच्या वेळी सुटका करण्यात आलेल्या ४५ मुलांची मागील ८ दिवसांपासून ‘बाल कल्याण समिती’च्या वतीने चौकशी चालू होती. या चौकशीच्या वेळी १४ वर्षीय मुलीने संस्थाचालक मागील काही महिन्यांपासून तिचा विनयभंग करत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांजवळ केली. या तक्रारीच्या आधारे ‘जिल्हा महिला बाल विकास’ विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संबंधित संस्थाचालकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. येथे अन्यही गैरप्रकारही बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चच्या वैधतेविषयी शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित चर्चच्या वतीने बेघर, वयोवृद्ध, मतिमंद नागरिक यांसमवेतच अल्पवयीन मुलांचा मागील काही वर्षांपासून सांभाळ केला जात आहे; परंतु मागील काही दिवसांत या ठिकाणी लहान मुलांची संख्या वाढत असल्याची माहिती ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी ५ ऑगस्ट या दिवशी चर्चला भेट दिली. त्या वेळी केवळ ३ लहान खोल्यांमध्ये ४५ अल्पवयीन मुले, तसेच इतर बेघर आणि मतिमंद आणि वयोवृद्ध नागरिक अस्वच्छ स्थितीत रहात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. संबंधित चर्च चालवणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’ या नावे २००६ या वर्षी संस्था नोंदणीकृत केल्याचे त्याने सांगितले; मात्र त्याविषयीची कागदपत्रे त्याला सादर करता आली नाहीत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी सर्व मुलांची रवानगी उल्हासनगर आणि नेरूळ येथील शासकीय बालगृहात केली होती.

(हेही वाचा ‘दी काश्मीर फाईल्स’नंतर आता ‘द केरला स्टोरी’, आयसिसने तस्करी केलेल्या ३२ हजार हिंदू महिलांची कथा)

केरळातील पाद्र्याकडून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती

को  ट्टियूर, जिल्हा वायनाड, केरळ येथे कार्यरत असणाऱ्या रॉबिन वडाकूम चेरी या ख्रिस्ती पाद्री धर्मगुरूने ११ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. त्यामुळे या वासनांध पाद्र्याचे खरे रूप समोर आले. या प्रकरणी त्याच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३७५, ३७६, तसेच ‘पोक्सो’ कायद्यातील कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. त्याने अटक टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शेवटी फेब्रुवारी २०१७ मध्ये कॅनडाला पळून जात असतांना विमानतळाच्या रस्त्यावरच त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कारागृहामध्ये आहे. हा खटला ‘पोक्सो’ न्यायालयामध्ये चालू झाला. तेव्हा आरोपी पाद्री चेरी याने न्यायालयामध्ये बलात्कार केल्याचे नाकारले. त्याने सांगितले, ‘मुलीने तिच्या वडिलांसमवेत शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गरोदर झाली आहे. माझा या बलात्काराशी काहीही संबंध नाही. पीडिता स्वेच्छेने शारीरिक संबंध ठेवत होती. मला फसवण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले आहे.’ चेरी याने आरोप नाकारल्यामुळे सरकारच्या वतीने ‘डीएनए.’ (अनुवंशिकता) चाचणी करण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य केली. चाचणी केल्यानंतर पाद्री चेरी याने केलेल्या लैंगिक शोषणातूनच पीडितेला गर्भधारणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे न्यायालयाने ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत रॉबिन चेरी याला २० वर्षांची सक्तमजुरी आणि ३ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

अल्पवयीन मुलावर अत्याचार करणारा मुंबईतील फादर

डिसेंबर २०२१ मध्ये १३ वर्षांच्‍या मुलाचे लैंगिक शोषण केल्‍याच्‍या प्रकरणी फादर (ख्रिस्‍ती धर्मगुरु) जॉन्‍सन लॉरेन्‍स याला विशेष पॉक्‍सो न्‍यायालयाने सश्रम जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई सत्र न्‍यायालयातील विशेष पॉक्‍सो न्‍यायालयाने २९ डिसेंबर या दिवशीच्‍या सुनावणीत हा निर्णय दिला. वर्षे २०१५ च्‍या डिसेंबरमध्‍ये जॉन्‍सन लॉरेन्‍स याला संबंधित मुलाचे लैंगिक शोषण केल्‍याच्‍या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तेव्‍हापासून तो  कारागृहात आहे. पीडित मुलगा हा वर्षे २०१५ मध्‍ये चर्चमध्‍ये नियमित प्रार्थनेसाठी जात होता. त्‍या काळात आरोपी जॉन्‍सन लॉरेन्‍स यांनी प्रार्थनेनंतर सर्वजण गेल्‍यानंतर त्‍याला एकट्याला थांबवून अनैसर्गिक अत्‍याचार केले होते. पीडित मुलगा हा गरीब कुटुंबातील होता. चर्चमधून मिळणाऱ्या साहाय्‍यावर परिणाम होईल या भीतीने त्‍याने याची कुणालाही माहिती दिली नाही; मात्र हळूहळू त्‍याच्‍या मानसिकतेवर त्‍याचा परिणाम होऊ लागला. आजारी पडल्‍याने त्‍याला रुग्‍णालयात दाखल केले. रुग्‍णालयातून आल्‍यानंतर पुन्‍हा जॉन्‍सन लॉरेन्‍स यांनी त्‍याच्‍यावर अत्‍याचार चालू केले. अखेर या मुलाने त्‍याच्‍या आईला सर्व सांगितले. त्‍यानंतर त्‍याच्‍या आई-वडिलांनी पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदवली होती.

नन’वर बलात्कार करणाऱ्या पाद्र्याचे पोपकडून समर्थन

जून २०२२ मध्ये केरळमधील एका ननवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी बिशप फ्रँको मुलक्कल याला बिशप पदावरून, तसेच ‘पाद्री’पदावरून हटवण्यात आले होते. नुकतेच मुलक्कल याला या प्रकरणी केरळमधील जिल्हा आणि सत्र  न्यायालयाने निर्दोष ठरवले. त्यानंतर पोप फ्रान्सिस यांच्याकडून मुलक्कल याला पुन्हा पाद्री म्हणून काम करण्याची अनुमती देण्यात आली आहे. सध्या मुलक्कल यांच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयात खटला चालू आहे.

(हेही वाचा संघर्ष निरंतर जारी है अब पठाण कि बारी है! सोशल मीडियात ट्रेंड होतोय #BoycottPathan)

पैशाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एप्रिल २०२२ मध्ये येथील ललियाना गावात ऑल विट या ६७ वर्षीय पाद्रीला ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. पीडित मुलीचे कुटुंब चर्चजवळच रहाते. हा पाद्री मूळचा तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील फुत्तुर गावातील रहाणारा आहे. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, आम्ही पुष्कळ गरीब आहोत. दिवसभर मी पती समवेत शेतात काम करते आणि मुलगी घरी असते. पाद्र्याने तिला चर्चमध्ये बोलावले आणि तिला पैसे देऊन तिला अश्‍लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला. गावातील काही जणांनी माझ्या मुलीकडे पैसे पाहून आणि ती दुकानातून साहित्य खरेदी करत असल्याचे पाहून आम्हाला कळवले. यानंतर आम्ही मुलीला पैशांविषयी विचारल्यावर तिने घडलेली घटना सांगितली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.