
-
प्रतिनिधी
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि ऊर्जेच्या खर्चात बचत व्हावी यासाठी ‘सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली.
पारंपरिक ऊर्जेच्या मर्यादा लक्षात घेता, शासनाने अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोगाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, लातूर आणि वर्धा या आठ जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित १० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे.
(हेही वाचा – Central Bank ला भीषण आग; सगळी रोकड जाळून खाक)
दोन टप्प्यात पूर्ण होणार प्रकल्प
- पहिल्या टप्प्यात २५० प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण पूर्ण झाले आहे.
- दुसऱ्या टप्प्यात दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण जून २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे.
सौरऊर्जीकरणामुळे आरोग्य केंद्रांना २४ तास वीज उपलब्ध
या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना २४ तास अखंड वीजपुरवठा मिळेल आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल. याशिवाय, ऊर्जेच्या खर्चात मोठी बचत होणार असून आरोग्य केंद्रे विजेच्या बाबतीत स्वावलंबी होतील.
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “सौरऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर पर्यावरण जागरूकता वाढेल, कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.”
(हेही वाचा – मुंबईत उच्चभ्रू Sex Racket उद्ध्वस्त; हिंदी मालिकेतील ४ अभिनेत्रींची सुटका, एकाला अटक)
राज्य शासनाला ५० कोटींची मदत
या प्रकल्पासाठी सेल्को फाउंडेशन आणि आयकिया कंपनी राज्य शासनाला ५० कोटींची मदत करणार आहेत. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांना सौरऊर्जा प्रणालीच्या वापर आणि देखभालीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यातील आरोग्य सेवेला पर्यावरणपूरक आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community