१ फेब्रुवारीला राज्यातील प्राथमिक उपकेंद्रे राहणार बंद; डॉक्टरांचे आंदोलन

80

प्रलंबित पगारवाढ तसेच इतर मागण्यांसाठी राज्यात १ फेब्रुवारी रोजी समुदाय आरोग्य अधिकारी प्रवर्गातील डॉक्टरांनी एका दिवसीय लक्षवेधी आंदोलन पुकारले आहे. राज्यातील दहा हजार प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील तब्बल ९ हजार समुदाय आरोग्य अधिकारी कामात सहभागी होणार नाहीत. आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका न दर्शवल्यास बुधवारी बेमुदत संपाबाबत आम्ही भूमिका जाहीर करु, असेही डॉक्टरांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

( हेही वाचा : BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी ४ फेब्रुवारीला? )

महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्यावतीने समुदाय आरोग्य अधिका-यांनी एकदिवसीय लक्षवेधी आंदोलनाचे आयोजन केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून पगारवाढ झाली नसल्याने काही ग्रामीण आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांनी पदाचा राजीनामा दिला. दहा हजारांहून अधिक जागांवर आता प्रत्यक्षात केवळ ९ हजार डॉक्टर्स कार्यरत आहेत. पगारवाढ नसताना काही खासगी कारणांमुळे गरजेच्या भागांत बदल्याही नाकारल्या जात असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला. याविरोधात १६ जानेवारीलाही एकदिवसीय आंदोलन केले होते. त्यानंतरही वरिष्ठांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १ फेब्रुवारीला एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करावे लागत असल्याचे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.