PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी 70 हजार तरुणांना दिली सरकारी नोकरीची पत्रे;’रोजगार मेळाव्या’त म्हणाले….

133

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रोजगार मेळाव्या’त 70 हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांचे ‘नियुक्ती पत्रे’ वाटली. देशभरातील 43 जागांवर याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे भरती केली जात आहे. वित्त, पोस्ट, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, महसूल, अणुऊर्जा, रेल्वे, लेखा आणि गृह यांसह अनेक विभागांमध्ये भरती करण्यात आली आहे. iGot प्लॅटफॉर्मद्वारे, या कर्मचाऱ्यांना ‘कर्मयोगी प्रमध’ मॉड्यूलद्वारे प्रशिक्षण दिले जाईल.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हे रोजगार मेळावे एनडीए आणि भाजप सरकारची नवीन ओळख बनले आहेत. भाजपशासित सरकारही सातत्याने असे रोजगार मेळावे आयोजित करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, जे लोक यावेळी सरकारी नोकरीत येत आहेत त्यांच्यासाठी हा वेळ अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण तुमच्या समोर पुढच्या 25 वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष आहे.

(हेही वाचा Twitter : ट्विटरच्या माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या चोराच्या उलट्या बोंबा; केंद्र सरकारने सुनावले )

मुद्रा योजनेमुळे कोट्यवधी तरुणांना मदत झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. स्टार्ट-अप इंडिया आणि स्टँड-अप इंडिया सारख्या मोहिमांनी तरुणांची क्षमता आणखी वाढवली आहे. सरकारकडून मदत मिळालेले हे तरुण आता स्वत: अनेक तरुणांना नोकऱ्या देत आहेत. ते म्हणाले की, आज संपूर्ण जग आपल्या विकासाच्या प्रवासात आपल्यासोबत चालण्यास तयार आहे. पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की, भारतावर आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर यापूर्वी कधीही विश्वास नव्हता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.