पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर संदेश जारी केला आहे.
ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा. हा दिवस आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या आणि जीवनाविषयी अनेक गोष्टी शिकवणाऱ्या सर्व अनुकरणीय गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. आपल्या समाजाने शिक्षण आणि विद्वत्तेला प्रचंड महत्त्व दिले आहे. आपल्या गुरूंचे आशीर्वाद भारत देशाला नव्या उंचीवर घेऊन जावोत, हीच सदिच्छा असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
( हेही वाचा: माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी )
आषाढ पौर्णिमा
आषाढ पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी सर्वांना शुभेच्छा. या निमित्ताने आपण भगवान बुद्धांच्या उदात्त शिकवणींचे स्मरण करूया आणि त्यांच्या ज्ञानी दृष्टीने कल्पिलेल्या न्यायी आणि दयाळू समाज प्रत्यक्षात साकारण्यासाठीच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करूया असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणालेत.
Join Our WhatsApp Community