पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्यांशी संवाद, खेळाडूंचे केले अभिनंदन

98

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये ( Commonwelath Games 2022) भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी काॅमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये एकूण 61 पदकांची कमाई केली. यानिमित्ताने खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके जिंकली आहेत.

कुस्तीमध्ये भारताने एकूण 12 पदके जिकंली आहेत. या खेळात भारतीय कुस्तीपटूंनी 6 सुवर्ण, एक रौप्य आणि 5 कांस्य पदके जिंकली आहेत. तसेच, वेटलिफ्टिंगमध्ये भारताने 10 पदके जिंकली आहेत. याशिवाय भारतीय बाॅक्सर्सनेही सात पदकांवर नाव कोरले आहे.

भारतासाठी पदक जिंकणा-या खेळाडूंची नावे

सुवर्णपदक-22

मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लाॅन बाॅल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगाट, नवीन, भाविना, नीतू घणघस, अमित पंघल, एल्डहाॅस पाॅल, निकहत जरीन, शरत कमल-श्रीजा अकुला, पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक- चिराग, शरथ कमल.

रौप्यपदक-16

संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लाॅन बाॅल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरत- साथियान, भारतीय महिला क्रिकेट टीम, सागर, पुरुष हाॅकी संघ.

कांस्यपदक-23

गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव, घोषाल- दिपिका, श्रीकांन किदाम्बी, त्रिशा- गायत्री, साथियान.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.