पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी, (12 जानेवारी) सिंहस्थनगरी नाशिकमध्ये आगमन होणार आहे. प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि दक्षिण काशी, अशी ख्याती असलेल्या गोदावरी नदीची आरती त्यांच्या हस्ते केली जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी रोषणाई आणि सहस्र दीपांनी गुरुवारी सायंकाळी गोदाकाठ आणि काळाराम मंदिर उजळून निघाला आहे.
काळाराम मंदिराचे दर्शनही मोदी घेणार आहे. अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी नाशिकमध्ये शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. यानिमित्त नाशिकमध्ये रामकुंड येथे पंतप्रधानांकडून गोदा आरती होईल.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा; मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम स्थळांची पाहणी)
राम घाटावर दर्शन घेणारे पहिले पंतप्रधान…
देशाचे पहिले पंतप्रधान मोदी आहेत जे राम घाटावर जाऊन दर्शन घेणार आहेत. येथील रामकुंड परिसर फुलांनी सजला आहे. त्यांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक नृत्याचे आयोजन करण्यात आले. त्याशिवाय ढोल-ताशा पथक, लेझिम पथक इत्यादी विविध पथके रस्त्यावर आपली कला सादर करून मोदींचे स्वागत होणार आहे. विविध संस्कृती आणि परंपरांचं दर्शन या स्वागताच्या निमित्ताने केले जाणार आहे. रोड शो चे आयोजनही करण्यात आले आहे. नाशिकच्या रस्त्यांवर उत्सवाचं स्वरुप पाहायला मिळत आहे. मोदींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या, तसेच रंगरंगोटी करण्यात आली असून, प्रभू श्रीरामाची नगरी पूर्णपणे भगवी करण्यात आली आहे. नाशिकच्या चौकाचौकांत महापुरुषांचे फ्लेक्स झळकताना दिसत आहेत. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फ्लेक्सचाही समावेश आहे.
केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाचे हजारो जवान नाशिकमध्ये दाखल
पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाचे हजारो जवान नाशिकमध्ये दाखल झाले असून, युवा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोदींच्या दौरा मार्गाची नाकाबंदी करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणाही नाशिकला सजवण्यासाठी राबत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोदी लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडणार आहेत. मोदी रोड शो, काळाराम मंदिराचे दर्शन, गोदाकाठाची पाहणी करणार असून, सभेलाही संबोधित करणार आहेत. या दौऱ्यातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने शक्तिप्रदर्शनाची पूर्ण तयारी केली आहे. मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी केंद्रीय, तसेच राज्य राखीव दलाचे हजारो जवान नाशिकमध्ये दाखल झाले असून, पूर्वसंध्येला मोदींच्या दौरा मार्गाची पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली आहे.
दौऱ्याचे स्वरुप कसे असेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर सकाळी 10 वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने निलगिरी बाग येथे दाखल होतील. त्यानंतर हॉटेल मिरचीपासून त्यांच्या रोड शोला सुरुवात होईल. हा रोड शो तपोवनातील सिटीलिंक कार्यालयापर्यंत असेल. त्यानंतर थेट काळाराम मंदिराचे दर्शन आणि गोदा आरतीला ते हजेरी लावतील. आरतीनंतर थेट रामकुडांची पाहणी करतील. मोदी तपोवनातील सभास्थळी सकाळी साडेअकराला दाखल होणार आहेत. सभेनंतर निलगिरी बाग येथून हेलिकॉप्टरने थेट ओझर विमानतळाकडे प्रयाण करतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community