Navi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी ‘नमो महिला अभियाना’चा शुभारंभ !

नवी मुंबई आणि बेलापूर-उरण मार्गावरील रेल्वे सेवेचे लोकार्पण

115
Navi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'नमो महिला अभियाना'चा शुभारंभ !
Navi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'नमो महिला अभियाना'चा शुभारंभ !

‘नमो महिला सशक्तीकरण’ या अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांच्या हस्ते ३० ऑक्टोबरला होणार आहे. याच दिवशी नवी मुंबई (navi mumbai) आणि बेलापूर-उरण (Belapur-Uran) मार्गावरील रेल्वे सेवेचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

या देशव्यापी अभियानाकरिता नरेंद्र मोदी नवी मुंबईत येणार असल्याने गेल्या एक महिन्यापासून सरकारी यंत्रणांची लगबग सुरू होती. मोदींच्या या कार्यक्रमाला सुमारे १ लाख २० हजार महिला आणण्याचे मोठे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम – उमेद) या विभागावर सोपवण्यात आले होते, मात्र कार्यक्रमाची तारीख निश्चित नसल्यामुळे सरकारी यंत्रणांचा मोठा गोंधळ उडाला होता तसेच हा कार्यक्रम म्हणजे भव्य सोहळा असल्यामुळे त्याची जागाही तेवढीच भव्य हवी असल्याने सरकारी यंत्रणांच्या जागेचा शोधही सुरू होता.

(हेही वाचा – GST Invoice Scam : मुंबईत 263 कोटींच्या बनावट जीएसटी चलन रॅकेटचा पर्दाफाश; एकाला अटक)

बामणडोंगरीपासून (Bamandongari) उरणदरम्यान सर्व रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले असल्याने मोदींच्या हस्ते बेलापूर ते उरण रेल्वेमार्गाचे लोकार्पण होणार आहे. नमो महिला सशक्तीकरण अभियानातून लाखो महिला बचत गटांना नव्या सवलती मिळणार आहेत.

सरकारतर्फे १ लाख २० हजार महिलांची उपस्थिती
हा भव्यदिव्य कार्यक्रम नवी मुंबईतील उलव्याजवळील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (International Airport)  बांधकाम क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला पनवेलमधील स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदारी देण्यात आली आहे. १ लाख २० हजार महिला सरकारकडून उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे सांगण्त येत आहे याशिवाय कार्यक्रमाला १ लाखांहून जास्त वाहने येणार असल्याने त्यांच्या वाहनतळाची व्यवस्था करण्यासाठी २० हेक्टर जागा आरक्षित केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.