पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुरुवारी मुंबई दौरा आहे. या दौ-यादरम्यान ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, पंतप्रधानांच्या दौ-यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. संध्याकाळी मुंबईतील बीकेसीवर सभा होणार आहे. या सभेत मोदी काय बोलणार याचीही उत्सुकता आहे.

वाहतूक मार्गांत बदल

नरेंद्र मोदींच्या दौ-यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे विविध माध्यामांतून वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे. माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ट्वीटरवर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

( हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा; कडक पोलीस बंदोबस्त  )

मोदी यांच्या दौ-यानिमित्त बीकेसी आणि गुंडवली रेल्वे स्थानक बंद राहणार आहे. तर 4:15 ते 5:30 वाजता या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी तसेच 5:30 ते 5:45 या वेळेत उत्तरवाहिनी वाहतूक संथ गतीने सुरु राहणार आहे. पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सीलिंककडून बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणा-या सर्व वाहनांना फॅमिली कोर्ट जंक्शनकडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवेश बंदी राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here