मुंबई महापालिकेवर आपली सत्ता प्रस्तावित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने मिशन मुंबईचा प्लॅन आखला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक मनावर घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांचे मुंबई दौरे वाढले आहेत. अशातच आता पंतप्रधान मुंबईच्या दौ-यावर आहेत. त्यानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मार्गात काही बदल केले आहेत.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी सीएसएमटी स्थानकावरुन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2:45 ते 4:15 पर्यंत वाहतूक मार्गात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मरोळमध्ये मोदींचे कार्यक्रम असतील.
( हेही वाचा: चीनचे मोठे षड्यंत्र; 40 देशांमध्ये सोडले ‘स्पाय बलून’ )
असे असतील बदल
- ईस्टर्न फ्री वे मार्गावरची वाहतूक बंद करुन, डी एन रोड आणि जेजे ब्रिजवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे सीएसटीला जाण्यासाठी वाहनांनी ईस्टर्न फ्री वे मार्गाचा वापर केला जाणार नाही
- कुलाब्यातल्या बधवर पार्क, नेव्ही नगर आणि कफ परेडची वाहतूक मंत्रालयाकडून वळवण्यात आली आहे. 2:45 ते 4:15 पर्यंत हे बदल करण्यात आले आहेत.
- अंधेरी, घाटकोपर- कुर्ला रोडवरील मरोळ नाक्याच्या दिशेने येणारी वाहने साकीनाका जंक्शन येथून जे.व्हि.एल. आर रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जातील.
- मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्धघाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता पोलीस यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांकडून जवळपास 1000 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.