महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शुक्रवारी सकाळी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महिला आघाडीच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी महिलांप्रती झुकून आदर व्यक्त केला.
यासंदर्भातील व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शुक्रवारी सकाळपासूनच भाजपच्या कार्यालयाबाहेर महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गुलालाची उधळण करून आणि मिठाई वाटून ते विधेयक मंजूर झाल्याचा आनंद साजरा करत असल्याचे दिसत आहे.
(हेही वाचा – Sweepers : सफाई कामगारांसाठी सुमारे २४ लाखांची हजेरी चौकी )
#WATCH | Women’s Reservation Bill | Women felicitate Prime Minister Narendra Modi at the BJP Headquarters in Delhi; PM bows before them to pay them respect. pic.twitter.com/mBQOkhtHUY
— ANI (@ANI) September 22, 2023
७ तासांच्या चर्चेनंतर विधेयक मंजूर
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. 20 सप्टेंबर रोजी लोकसभेत ७ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्याच्या बाजूने ४५४ तर विरोधात २ मते पडली. २१ सप्टेंबर रोजी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. सभागृहात उपस्थित सर्व २१४ खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला आणि विधेयक मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक विधानसभांमध्ये पाठवले जाणार आहे. त्यांच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
महिला शक्तीला नवी ऊर्जा मिळणार
22 सप्टेंबरला संपणारे हे विशेष अधिवेशन 21 सप्टेंबरला राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊन संपलं. देशातील सर्व राजकीय पक्षांचा या विधेयकाबाबतचा सकारात्मक विचार आपल्या देशातील महिला शक्तीला नवी ऊर्जा देणार असल्याचे मत विधेयक मंजूर झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community