पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे येत असलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी ते प्रत्येक पाहुण्यांना कोणार्क चक्राचे महत्त्व पटवून सांगत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत सहभागी होण्यासाठी येत असलेल्या प्रत्येक देशांच्या पाहुण्यांना कोणार्क चक्राचे महत्त्व सांगत होते. विशेषत: अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आले तेव्हा त्यांनी कोणार्क चक्राची विस्तृत माहिती दिली. यावेळी उभय नेत्यांमध्ये हास्यविनोदसुद्धा झाला.
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनाही कोणार्क चक्राचे महत्त्व सांगितले. या सर्व नेत्यांसोबत पीएम मोदींची जुगलबंदीही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची त्यांनी भेट घेतली.पंतप्रधान मोदींनी आधी ऋषी सुनक यांच्याशी हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांना मिठी मारली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली आणि छायाचित्रेही घेतली.
(हेही वाचा – G-20 Summit : G20 चे नेते आणि त्यांच्या पत्नी यांच्यासाठी भारतीय कलेचे दर्शन घडवणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन !)
पीएम मोदींच्या भेटीदरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्यासोबत हस्तांदोलन केले आणि एकमेकांशी चर्चा केली.यानंतर परत जाताना इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनीही पंतप्रधान मोदींना हात जोडून अभिवादन केले. ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ हे आपल्या पत्नीसह जी-20 परिषदेत पोहोचले.पीएम मोदींनी ब्राझीलच्या राष्ट्रपतींचे मिठीत स्वागत केले आणि त्यांच्या पत्नीशी हस्तांदोलनही केले, मात्र दोन्ही नेते फोटो काढत असताना अध्यक्ष इनासिओ यांच्या पत्नी निघून गेल्या.
G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आलेले अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांचे पंतप्रधान मोदींनी आलिंगन देऊन स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमधील मैत्रीही कॅमेऱ्यात कैद झाली.
हेही पहा –