माझगाव येथील प्रिन्स अलीखान रुग्णालयाच्या इमारतीला धोकायदाक म्हणून असल्याचे दाखवून हे रुग्णालयच बंद करण्याचा घाट व्यवस्थापनने घातला आहे. रुग्णालयाच्या इमारतीचा एक भाग अतिधोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये दिसून आढळून आल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. मात्र, या रुग्णालयाची इमारत अतिधोकादायक असल्याचा अहवालच कामगारांच्या न दाखवता हे रुग्णालय बंद करण्याचा घाट घालत एकप्रकारे येथील सुमारे एक हजार रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना देशाधडीला लावण्याचे काम व्यवस्थापकडून सुरु असल्याचा आरोप आता कामगारांकडून केला जात आहे.
( हेही वाचा : मुंबईतील ‘त्या’ १३ पुलांवर नाच गाणी बंद)
प्रिन्स अली खान रुग्णालयाची इमारत अतिधोकादाक असल्याचा अहवाल २० ऑगस्ट रोजी प्राप्त झाल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने नवीन रुग्णांना दाखल करण्यास मनाई केली. तळ अधिक चार मजल्याच्या या रुग्णालयीन इमारतीत विविध प्रकारच्या रुग्णांसाठी वॉर्ड असून कोविड काळात या रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले होते. कोविड काळात चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या या रुग्णालयाने इमारत अतिधोकादायक असल्याचा स्ट्रक्चरल ऑडीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रथम ओपीडी आणि त्यानंतर शस्त्रक्रीयागृह बंद केला. त्यामुळे येथील डॉक्टर, नर्स, आया, वॉर्डबॉय यांच्यासह सर्व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसलेले आहे. रुग्णालय बंद झाल्यास आपली नोकरी जाईल या भीतीने प्रत्येक पाळीमध्ये आपली सेवा बजावल्यानंतर प्रत्येक कर्मचारी भीतीने घरीही जात नाही. आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्याकरता तो कामगार संघटनेसोबत तेवढ्याच ताकदीने उभा राहिलेला दिसून येत आहे.
प्रिन्स अलीखान कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळेकर आण् सरचिटणीस किरण लोंढे आदींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कामगार आपली लढाई लढण्यासाठीही मैदानात उतरलेला पहायला मिळत आहे. याबाबत बोलतांना संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळेकर यांनी, या इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवालाची प्रत अद्यापही कामगार संघटनेला दाखवली जात नाही किंबहुना ती कुठल्याही इमारतीच्या भिंतीवर प्रदर्शित केलेली नाही. तसेच महापालिकेने ही रुग्णालय इमारत धोकादायक झाल्याची नोटीस रुग्णालयाला बजावलेली नाही. तरीही रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीटसाठी नेमलेल्या महिमतुला कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अहवाल भिंतीवर प्रदर्शित केला गेला नाही,असा सवाल केला. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांना निवेदन सादर केले आहे.
यामध्ये त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे महिमतुला कन्सलंटने बनवलेला स्ट्रक्चरल ऑडीटचा अहवालाची फेरतपासणी केली जावी तसेच अन्य सल्लागार कंपनीकडून याचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जावे अशी मागणी केली असल्याचे तळेकर यांनी स्पष्ट केले.
रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. परंतु कर्मचाऱ्यांचे पगार आजही ते देत असले तरी येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये रुग्णालय रुग्णांअभावी तोट्यात असल्याचे दाखवून कर्मचाऱ्यांना बेकारीच्या खाईत लोटले जाईल याबाबत त्यांनी भीती व्यक्त केला आहे. एखादी इमारत अतिधोकादाक बनल्यानंतर त्यांना जर महापालिकेची नोटीस बजावली जाते तर मग या इमारतीला महापालिकेची नोटीस का नाही असा सवाल करत तळेकर आणि लोंढे यांनी या अहवालाच्या नावाखाली परस्पर रुग्णालय बंद करण्याचा घाट असल्याचाच आरोप केला आहे. त्यामुळे सुमारे ९५० ते १००० रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असून याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री तसेच महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे अशी विनंती तळेकर यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community