आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना आज अपर मुख्य सचिव या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच त्यांची आहे त्या विभागात पदस्थापना करण्यात आली आहे.

कोरोनाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका

वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉ. व्यास हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८९ बॅचचे अधिकारी आहेत. जयपूर येथे एमबीबीएस आणि त्यानंतर एमडी पेडीयाट्रीकचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. राज्यात कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात ते महत्वपूर्ण भूमिका बजावत असून, त्यांचे वैद्यकीय ज्ञान आणि अनुभव त्यासाठी कामी येत आहे.

कोण आहेत व्यास?

सेवेची सुरुवातीची आठ वर्षे त्यांनी तामिळनाडूच्या उद्योग आणि वित्त विभागात सेवा बजावली. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांनी कृषी क्षेत्राशी निगडीत राज्य बियाणे महामंडळ आणि कृषी औद्योगिक विकास महामंडळात आठ वर्ष सेवा केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी, राज्याचे वित्त सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जुलै २०१७ पासून डॉ. व्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. आदर्श घोटाळ्यातही त्यांचे नाव समोर आले होते. या घोटाळ्यात त्यांना दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगावा लागला होता. 2023 मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here