जयपूरमधील (Jaipur) महिला पॉलिटेक्निक कॉलेजच्या (Mahila Polytechnique college) माजी प्राचार्य मशकूर अली (Mashkoor Ali) यांना अटक करण्यात आली आहे. मशकूर अली (Mashkoor Ali) याच्यावर महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनींनीही त्याच्या विरोधात निदर्शने केली होती. पोलिसांनी त्याच्यावरील आरोपांना दुजोरा दिला आहे.
( हेही वाचा : Gautam Gambhir : गौतम गंभीर भारतीय अ संघाबरोबर इंग्लंडला जाणार?)
विद्यार्थिनींनी केलेल्या आरोपांच्या आधारे चौकशीनंतर जयपूर पोलिसांनी मशकूर अलीला (Mashkoor Ali) अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एसआयटी (SIT) चौकशी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थीनींनी केलेले आरोप खरे असल्याचे कळले. या प्रकरणी विद्यार्थिनींनीही त्यांचे जबाब नोंदवले होते. विद्यार्थिनींनी सांगितले होते की, मशकूर अलीने (Mashkoor Ali) वॉशरूममध्ये कॅमेरा बसवला होता. तसेच त्यातून व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असल्याचा आरोपही पीडितांनी केला.
याप्रकरणी सुरुवातीला विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी तंत्रशिक्षण विभागाच्या (Technical Education Department) सचिवांकडे तक्रार केली होती. यानंतर चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. तपासात दोषी आढळल्यानंतर मशकूरला (Mashkoor Ali) निलंबित करण्यात आले. यानंतर, दि. १० मार्च रोजी पुन्हा चौकशी समिती महाविद्यालयात चौकशीसाठी पोहोचली, त्यादरम्यान विद्यार्थिनींनी निषेध केला.
मशकूर अलीला वाचवण्यासाठी पुन्हा चौकशी केली जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, मशकूर अली यांची २०२३ मध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हापासून तो विद्यार्थिनींशी गैरवर्तन करू लागला. पीडिता म्हणाल्या की, मशकूर (Mashkoor Ali) लायब्ररीच्या कोपऱ्यात असलेल्या कपाटाच्या मागे बसायचा, जो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये नव्हता. तो इथे मुलींना छेडायचा. याशिवाय, माजी प्राचार्य मशकूर अली स्वतःला विद्यार्थिनींच्या वैयक्तिक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. तो मुलींना अश्लील मेसेजही पाठवत असे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तो हाय प्रोफाइल लोकांशी संबंध ठेवण्याचे खोटे आश्वासन देऊन विद्यार्थिनींना त्याच्या गाडीत घेऊन जायचा आणि चालत्या गाडीत त्यांच्याशी गैरवर्तन करायचा. विद्यार्थिनींनी आरोप केला होता की, मशकूर अली त्यांना धमकी देत असे की जर कोणी पोलिसांकडे किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे तक्रार केली. तर तो त्यांचा व्हिडिओ व्हायरल करेल. विद्यार्थ्यांनी सांगितले की व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीमुळे कोणीही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती.
पीडित मुली म्हणाल्या की, “प्राचार्य मशकूर अली (Mashkoor Ali) म्हणायचे की तुम्हाला (मुलींना) इतर लोकांसोबतही झोपावे लागेल. तो म्हणायचा की त्याचे मोठ्या लोकांशी संबंध आहेत. तो मुलींचा पुरवठाही करतो. जर मुलींनी त्याचे ऐकले नाही तर त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. तरी आता अलीला (Mashkoor Ali) अटक करण्यात आलेली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community