-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी गुरुवारी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी अचानक भेट दिली. रुग्णांसाठीच्या सेवा सुविधा, औषध उपलब्धतता, स्वच्छता, तसेच विविध शासकीय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. विविध विभागांची आपत्कालीन स्थिती हाताळण्याच्या सज्जतेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजामध्ये पुरेसे मनुष्यबळ नेमतानाच नियमित स्वच्छता ठेवण्याबाबतचे निर्देश याप्रसंगी डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी यावेळी दिले
रुग्णांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने डॉक्टरांची अधिक उपलब्धतता असावी, तसेच नियमितपणे वेळेत रुग्णसेवा उपलब्ध होतील, यासाठीचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी महापालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना केल्या. तसेच रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्याच्याही सूचनाही डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी दिल्या आहेत.
(हेही वाचा – Waqf Board च्या माजी अध्यक्षांची घोषणा; हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये देणार…)
जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी गुरुवारी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी अचानक भेट दिली. रुग्णांसाठीच्या सेवा सुविधा, औषध उपलब्धतता, स्वच्छता, तसेच विविध शासकीय योजनांचा त्यांनी आढावा घेतला. विविध विभागांची आपत्कालीन स्थिती हाताळण्याच्या सज्जतेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजामध्ये पुरेसे मनुष्यबळ नेमतानाच नियमित स्वच्छता ठेवण्याबाबतचे निर्देश याप्रसंगी डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी यावेळी दिले. याप्रसंगी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, वैद्यकीय अधिक्षक (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालय) डॉ. राजेश सुखदेवे, विशेष कार्य अधिकारी डॉ. महारूद्र कुंभार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
रुग्णालयातील अपघात विभाग, बाह्यरूग्ण विभाग येथे प्रत्यक्ष भेट देत डॉक्टरांच्या उपलब्धततेची माहिती डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी घेतली. तसेच आपत्कालीन प्रसंगी डॉक्टरांची कार्यतत्परता, डॉक्टरांची उपलब्धता कायम ठेवण्याबाबतचे निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. रुग्णांसाठीच्या सर्व सोयीसुविधा तातडीने उपलब्ध द्याव्यात. तसेच रुग्णालयात वैद्यकीय उपचारांच्या अनुषंगाने पुरेशी औषध उपलब्धतता ठेवावी.
वैद्यकीय सुविधेअंतर्गत रुग्णांशी संबंधित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणी तत्परतेने करण्यासाठीचे निर्देशही डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी दिले. तसेच रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांनी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी लावण्याबाबत सक्त निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले.
(हेही वाचा – New Income Tax Bill 2025 : नवीन आयकर विधेयक संसदेत सादर; जाणून घेऊया यातील १० महत्त्वाच्या तरतुदी)
शस्त्रक्रियागृह येत्या ३ ते ४ दिवसांत कार्यान्वित
रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह येथे नव्याने निर्जंतुकीकरण प्रणाली उभारण्याची कार्यवाही पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे येत्या ३-४ दिवसात शस्त्रक्रियागृह पूर्ण क्षमतेने शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दरम्यानच्या कालावधीत शस्त्रक्रिया आणि अपघात विभागातील कर्मचारी वर्गासाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रुग्णालय परिसरातील स्वच्छता पडताळणीसाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी विविध ठिकाणी पाहणी केली. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेबाबत त्यांनी आढावा घेतला. तसेच रुग्णांची वर्दळ असणारे परिसर प्रतीक्षालय, जिने, पायऱ्या, उद्वाहने याठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, सुसज्जतेची रंगीत तालिम नियमितपणे घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
पश्चिम उपनगरामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीतील तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रूग्णालय सर्वात जवळचे रुग्णालय आहे. या रुग्णालयाची स्थापना सन २०१३ मध्ये झाली. येथे एकूण ३०४ रुग्ण खाटा आहेत. अतिदक्षता विभागात १० ट्रॉमा मेडिकल आयसीयू उपलब्ध आहेत. तसेच सुसज्ज असा अपघात उपचार विभागदेखील आहे. न्यूरो सर्जरी विभाग, डायलिसिस तसेच रुग्णालयअंतर्गत असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community