खासगी बसप्रवास महागला; सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे फुल्ल!

81

येत्या १२ ते १६ ऑगस्टपर्यंत लॉंग वीकेंड (long weekend) असल्याने मुंबई-पुणेकरांनी फिरण्याचे प्लॅन आखले आहेत. लागोपाठ सुट्ट्या असल्याने महत्वाच्या पर्यटनस्थळी जाणाऱ्या सरकारी गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. त्यामुळे पर्यटकांना खासगी प्रवासी बससाठी दुप्पट भाडे मोजावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कोकण, गोवा, महाबळेश्वरला जाण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

 ( हेही वाचा : बेस्टच्या कंडक्टरला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला सहा महिन्यांची शिक्षा)

खासगी गाड्यांचे भाडे वाढले

महाराष्ट्रात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक कोकण, महाबळेश्वर, गोवा अशा पर्यटनस्थळांची निवड करतात. १२ ऑगस्टपासून मुंबईतून गोवासाठी वातानुकूलित स्लिपर बसचे भाडे अडीच हजार ते ३ हजार रुपयांपर्यंत आकारले जात आहे. तर महाबळेश्वरला जाण्यासाठी स्लिपर बसचे भाडे १२ ऑगस्टपासून १ हजार ते बाराशे रुपसे आहे. इतर वेळी महाबळेश्वरला जाण्यासाठी आसन असलेल्या बसचे भाडे ६०० ते ७०० रुपये असते. दरम्यान लॉंग वीकेंड लक्षात घेता ही भाडेवाढ तात्पुरती स्वरुपाची असल्याचे खासगी बसमालकांकडून सांगण्यात येत आहे.

पर्यटनस्थळे फुल्ल

दरम्यान ऑगस्ट महिन्यात सलग सुट्ट्या आल्यामुळे सर्व पर्यटनस्थळांवरील हॉटेल, रिसॉर्ट ८० टक्के बुक झाली आहेत. थंड हवेच्या ठिकाणी, धरण आणि धबधब्यांच्या ठिकाणांसह कोकण, गोवा येथे जाण्यासाठी मुंबईकर पसंती दर्शवत आहेत. तसेच माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर, मुरबाड, शहापूर, कर्जत, भिवपुरी, पालघर या जागांना सुद्धा सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.