रेल्वेगाड्या किंवा एसटीचे आरक्षण न मिळाल्याने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकडे फक्त खासगी बस किंवा वाहनांचा पर्याय उरला आहे. परंतु या खासगी बसच्या तिकीट दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई-ठाण्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे जाण्यासाठी स्लीपर श्रेणीतील बसला २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपये प्रवासभाडे आकारण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे-एसटीचे आरक्षण न मिळालेल्या चाकरमान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.
( हेही वाचा : परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग; महानगर पाईपलाईनमधून गॅस गळती)
खासगी बससाठी दुप्पट भाडे
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने जवळपास ३ हजार गाड्या सोडल्या आहेत. या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परंतु ज्या नागरिकांना आरक्षण मिळालेले नाही त्यांना खासगी बसशिवाय पर्याय नाही. मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्गात जाणाऱ्या वातानुकूलित स्लीपर बससाठी प्रति प्रवासी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहेत. तसेच कोकणात जाणाऱ्या विना-वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या बससाठी सध्या प्रति प्रवासी ७०० ते ८०० रुपये तिकीट आकारण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बससाठी दुप्पट भाडे मोजावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community