आता खासगी बस प्रवास महागला! किती रुपयांचा बसणार फटका?

सततची इंधन दरवाढ होत असल्यामुळे मुंबई-कोकण मार्गावर ये-जा करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांनी दरवाढीचा निर्णय घेतला.

161

तब्बल तीन वर्षांनंतर एसटीच्या तिकीटात भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याचा प्रवास तब्बल ७५ रुपयांनी महागला आहे. तर कोल्हापूरच्या प्रवासासाठी ३० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. कोकणातून मुंबईत जाण्यासाठी आता ४५० ऐवजी ५२५ रुपये द्यावे लागणार आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत प्रवास ५ रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत महागला आहे. या भाडेवाढीसाठी आता खासगी बस वाहतूकदारांनीही पुढाकार घेतला आहे. त्यांच्यामुळे मुंबई-कोकण मार्गावरील वाहतूक २० टक्क्यांनी महागली आहे.

इंधन दरवाढीमुळे निर्णय

सततची इंधन दरवाढ होत असल्यामुळे मुंबई-कोकण मार्गावर ये-जा करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांनी हा निर्णय घेतला. त्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत हा दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. सणासुदीचे दिवस, सलग सुट्ट्यांचे दिवस वगळून ही २० टक्के दरवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढते इंधन दरवाढ, बदलते वाहतूक नियम, रस्त्यांची दुरवस्था त्यामुळे बसगाड्यांच्या देखभालीचा वाढलेला खर्च या सर्व कारणांमुळे बस गाड्या बंद करण्याची वेळ आली आहे. त्यातून सावरण्यासाठी हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे खासगी बस वाहतूकदार म्हणत आहेत.

(हेही वाचा : आली लगीनघाई, कोरोनाला निमंत्रण देई…)

असे असतील नवे दर

  • बांदा, कुडाळ, कसाल – ७५०
  • कणकवली, तरळा, खारेपाटण – ७००
  • मालवण, चौके, कट्टा – १०००
  • कोळंब – ९००
  • आचरा, देवगड – १०००
  • हातीवले, राजापूर – ६५०
  • चिपळूण – ६००
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.