माहुलच्या पंपिंग स्टेशनसाठी खासगी विकासकाची जागा : प्रस्ताव मंजुरीत सत्ताधाऱ्यांची घाई

147

पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या माहुल येथील पंपिंग स्टेशनकरता आता खासगी विकासकाकडून जागा ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला सुधार समिती पाठोपाठ महापालिकेच्या बैठकीतही विना चर्चा मंजुरी देण्यात आली आहे. पंपिंग स्टेशनसाठी महापालिका आणि खासगी विकासकांच्या ताब्यातील जागांच्या अदलाबदलीबाबतच्या प्रस्तावाला अशा प्रकारे मंजुरी देण्यात आल्याने संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे. भाजपने याला तीव्र विरोध केला असून नगरसेवकांच्या गोंधळात शिवसेनेने या ३० कोटी रुपयांचा भूखंड पळवला असल्याचे त्यांनी सांगितले.

भूखंडांची अदलाबदल करण्याबाबतचा निर्णय

पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या माध्यमातून मागील ब-याच वर्षापासून माहुल पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा मिळविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. परंतु, त्याला यश न आल्याने माहूल येथे पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी ‘एम/पश्चिम विभागातील मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा आणिक न.भू.क्र. १२/१४ धारण करणारा भूखंड व मेसर्स अजमेरा रिएल्टी इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लि. यांच्या मालकीच्या आणिक न.भू.क्र. १२/११, १२/१२ या भूखंडांची अदलाबदल करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. माहूल पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी लागणाऱ्या १५,५०० चौ.मीटर जागेसाठी अजमेरा यांच्या मालकीच्या नगर भू क्रमांक. १२/११ व १२/१२ यया २८०८२.७० चौ.मीटर एकूण क्षेत्रफळ असलेला भूखंड योग्य असल्याने आहे. त्यापैकी १५,५०० चौ. मी. जागा पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी आवश्यक असल्याचे कळविले. ही जागा अतिक्रमण मुक्त आहे.

(हेही वाचा राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव! कल्याण – डोंबिवलीत सापडला पहिला रूग्ण)

महापालिका व खासगी विकासक यांच्यात समजंस्य करार

या जागेची अदलाबदल झाल्यानंतर महापालिकेकडे येणाऱ्या १३,९९० चौ.मीटर भूखंडाच्या आरक्षणास पावसाळी पाणी पंपिंग स्टेशन असा बदल करण्यात येईल. आणि मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच कामाला सुरुवात केली जाईल. या जागांच्या अदलाबदल करण्यासाठी महापालिका व खासगी विकासक यांच्यासोबत सामजंस्य करार केला जाणार आहे. या कराराच्या अनुषंगाने दोन्ही भूखंडांची अदलाबदल झाल्यानंतर त्यांच्या जागेच्या वापराबाबत विकास आराखड्यात महापालिकेला मिळालेल्या भूखंडावरील उद्यान, बगीच्या हे आरक्षण रद्द करून त्यावर पंपिंग स्टेशन हे आरक्षण टाकले जाणार असल्याने या मंजुरी प्राप्त करण्यासाठी हा प्रस्ताव सुधार समितीच्या सभेत सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव सुधार समितीत विना चर्चेत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तातडीचा विषय म्हणून गुरुवारी महापालिकेच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या दिरंगाईबाबत महापालिका सभेमध्ये जो निषेध व्यक्त करण्यात येत होता, त्यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

दीड लाख चौरस फुटाचा सीआरझेडमधील भूखंड घेण्याचा निर्णय

माहुल येथील पंपिंग स्टेशनसाठी एक खासगी भूखंड जो साडेचार लाख चौरस फुटांचा आहे, जो सीआरझेडच्या बाहेर आहे आणि बांधकामासाठी उपयुक्त ठरेल, असा भूखंड देण्याचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या गोंधळाचा फायदा घेत मंजूर करण्यात आला आहे. या बदलत्या महापालिकेला दीड लाख चौरस फुटाचा सीआरझेडमधील भूखंड घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर सभागृहाने मतदान मागूनही त्यांनी दिले नाही. हा भूखंड पळवता यावा म्हणून गोंधळ घालण्यात आला. जेव्हा भाजपचे नगरसेवक लहान बाळाचा मृत्यूचे प्रश्न विचारत होते, तेव्हा ३० कोटींचा भूखंड पळवत होती,असा आरोप ऍड आशिष शेलार यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.