खासगी रुग्णालयांतील गरिबांच्या आरक्षित खाटा २ टक्क्यांनी वाढणार

128
सध्या खासगी रुग्णालयांत गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी २ टक्के खाटा आरक्षित होत्या, आता त्यात आणखी २ टक्क्यांनी वाढ करून हा कोटा ४ टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारने यासाठी स्थापन केलेल्या तदर्थ समितीने घेतला आहे, त्यावर लवकरच मंत्रिमंडळाची संमती घेण्यात येईल, अशी माहिती तदर्थ समितीच्या अध्यक्षा, आमदार अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली.

या योजनेसाठी स्वतंत्र विभाग करण्याची मागणी 

आमदार अशोक पवार यांनी याविषयाची लक्षवेधी मांडली, त्यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले, खासगी रुग्णालयांमधील खाटा निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी आरक्षित असाव्यात, असा कायदा आहे. खासगी रुग्णालयांना सरकार मोक्याच्या जमिनी सवलती दरात देते, त्यांना कर सवलत देते, तसेच सरकारने मागील वर्षभर २३४ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणार का, मोठ्या आजारांच्या उपचाराच्या खर्चात एक वाक्यात आणणार का, अशी विचारणा केली. भाजपचे आमदार राम कदम म्हणाले,  जरी कायद्याने खासगी रुग्णालयात गरिबांना उपचार व्हावा अशी तरतूद असली, तरीही हिंदुजा, लीलावती रुग्णालयात गरिबांवर उपचार होतात का, असा प्रश्न आहे. जोवर यासाठी रुग्णालयांना धाक दाखवत नाही, तोवर गरिबांवर उपचार होणार नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांची मुख्य व्यवस्थापकांची आणि आमदारांची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी केली.

समितीचे अधिकार वाढवण्यासाठी प्रयत्न 

त्यावर बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, या योजनेवर अंमलबजावणी होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून २४ आमदारांची तदर्थ समिती नेमली आहे, ती समिती नियमित बनवावी म्हणून प्रस्ताव सभागृहात आणणार आहे. त्यामुळे समितीचे अधिकार वाढतील, तसेच या राखीव खाटांचा कोटाही २ टक्के वरून ४ टक्के करण्यात यावा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला १ लाख दंड आकारावा, कोरोना काळात पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाची तक्रार प्राप्त झाली होती, त्यावर १ महिन्यात कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.