कोरोनाच्या संकटामुळे पालकांना शाळांच्या शुल्कातून सूट मिळण्यासाठी मागील वर्षी शुल्कात 10 टक्के सूट देण्यात आली होती. पण आता कोरोनानंतर मात्र शाळांनी शुल्कात वाढ करण्याचा निर्यण घेतला आहे. सध्या नियमीत शाळा सुरु आहेत. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच्या प्रवेश शुल्कामध्ये खासगी शाळांनी तब्बल 25 ते 30 टक्के वाढ करत पुन्हा लूट सुरु केली आहे.
पालकांची लूट सुरु
सध्या महागाई गगनाला भिडली आहे. त्यात सरकारी नोकर वगळता बाकी सर्व पालक अजूनही आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे आता शाळांनी केलेली शुल्क वाढ पालकांच्या खिशाला कात्री लावणार आहे. सीबीएसई शाळांच्या शुल्कवाढीवर राज्य सरकारांनी नियंत्रण आणावे, अशी सूचना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे. त्यानुसार राज्य सरकारांनी केवळ कागदोपत्री नियंत्रण आणले. तसेच, खासगी शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांना राज्य शासनाची मान्यता घेण्याचे कोणतेही बंधन नसल्याने पालकांची वाटेल तशी लूट माजवली आहे.
( हेही वाचा: इंधन भडकले! वाहनचालक शेजारील राज्यात धावत सुटले…)
पालकांना थांगपत्ताही नाही
कोरोना काळात सर्व ठप्प असल्याने अनेकांचे रोजगार गेले, तर व्यावसायही बुडाले आहेत. अद्यापही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे शाळांच्या या मनमानी कारभारावर शिक्षण विभागाने नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे पालकांनी म्हटले आहे. शाळांमध्ये शुल्क निर्धारित करणा-या पालक-शिक्षक समित्या केवळ कागदावर असतात. याशिवाय काही शाळांमध्ये समितीची स्थापना झाली, तरी त्यात मर्जीतील व्यक्तींची निवड करुन संस्थाचालक मनासारखा कारभार करतात. अनेक पालकांना आपल्या पाल्याच्या शाळेत अशी समिती आहे, याची कल्पनाही नसते.
Join Our WhatsApp Community