देशातील तिस-या क्रमांकाची खासगी बॅंकेने कोट्यावधी ग्राहकांना धक्का दिला आहे. सीमांत खर्चावर आधारित व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. वाढीव व्याजदर तत्काळ लागू करण्यात आला आहे. देशातील तिस-या सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील बॅंकेने वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, 18 ऑक्टोबर 2022 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी मानक MCLR 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.35 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 8.10 टक्के होता.
रेपो दरवाढीनंतर व्याजदरात वाढ
वाहन, वैयक्तिक आणि गृहकर्जाचे दर एका वर्षाच्या MCLR च्या आधारावर ठरवले जातात. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 30 सप्टेंबर रोजी रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढवल्यानंतर Axis बॅंकेने MCLR दर वाढवला आहे. एक दिवस ते सहा महिन्यांपर्यंतच्या कर्जावरील MCLR देखील 0.25 टक्क्यांनी वाढवून 8.15-8.30 टक्के करण्यात आला आहे.
( हेही वाचा: धुळे: स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिघांनी बिबट्याला काठीने मारले )
Join Our WhatsApp Community