Priyanka Vadra यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट; केली ‘ही’ मागणी

161
Priyanka Vadra यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट; केली 'ही' मागणी
Priyanka Vadra यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट; केली 'ही' मागणी

केरळच्या वायनाडमध्ये जुलै महिन्यात झालेल्या भूस्खलनानंतर तेथे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावेच्या गावे उद्धस्त झाल्यामुळे शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. आतापर्यंत राहुल गांधी (Rahul Gandhi) हे तेथील खासदार होते. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका वाड्रा (Priyanka Vadra) या तेथून निवडून आल्या आहेत. नवनिर्वाचित खासदार प्रियांका वाड्रा यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

(हेही वाचा – Maharashtra Rain : राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अंदाज काय सांगतो ?)

प्रियंका गांधी वाड्रा यांनी केरळमधील (Kerala) लोकसभा सदस्यांसह बुधवार, ४ डिसेंबर या दिवशी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आणि वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना (wayanad landslides) मदत करण्याचे आवाहन केले. संसद भवन संकुलातील शाह यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीदरम्यान केरळमधील काँग्रेस, आययूएमएल आणि आरएसपीचे खासदारही उपस्थित होते.

शाह यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, “आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना वायनाडमधील परिस्थितीची माहिती दिली. तेथील लोकांवर भूस्खलनाचा मोठा परिणाम झाला आहे. लोकांची कुटुंबे आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांच्याकडे कुठलाही आधार उरलेला नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने काहीच केले नाही, तर लोकांनी कुणाकडून अपेक्षा करावी? आम्ही गृहमंत्र्यांना राजकारणापलीकडे जाऊन वायनाडच्या लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.”

यासंदर्भात आम्ही पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना निवेदन दिले असून पीडितांना मदत करण्याची विनंती केली असल्याचेही प्रियांका (Priyanka Vadra) यांनी या वेळी सांगितले. आपल्याला लोकांच्या समस्या माहीत आहेत आणि या संदर्भात शक्य तेवढी मदत केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.