दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. यामध्ये अनेक एनजीओ सुद्धा मोठं कार्य करत असतात. पंचमहाभूते फाउंडेशन या एनजीओतर्फे यंदाच्या वर्षी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
या संस्थेद्वारे ‘पर्यावरण विघ्नहर्ता 2022’ राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही (Eco Friendly) गणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणपूरक सजावट करणारी सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती सजावट करणा-या गणेशभक्तांचा या स्पर्धेतून सन्मान करण्यात आला.रविवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात या स्पर्धेचा पक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या स्पर्धेत एकूण 33 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
घरगुती सजावट विजेते
प्रथम पारितोषिक
हेरंब प्रधान, नवी मुंबई
द्वितीय पारितोषिक (विभागून )
आशिष पिंगळे, नाशिक
नरेंद्र सोनवणे – अहमदनगर
तृतीय पारितोषिक (विभागून)
अजय शिंदे – सांगली
आर.डी.कुंभोजकर – कोथरूड, पुणे
उत्तेजनार्थ पारितोषिके
रतिलाल बाबेल, जुन्नर
स्वप्नील वीर, सातारा – खंडाळा
निखिल नवले, सानपाडा नवी मुंबई
सतीश पवार, वरळी
वैदेही खाडिलकर, पुणे
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विजेते
प्रथम पारितोषिक
सीबीडीचा आदय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (नवी मुंबई)
द्वितीय पारितोषिक
शांती नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ(मीरा रोड)
Join Our WhatsApp Community