शैक्षणिक वर्ष 2024-25 (Academic year 2024-25) मधील बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) व उच्च माध्यमिक मंडळातर्फे (HSC) प्रसिद्धीपत्रक जारी करुन देण्यात आली आहे. हे वेळापत्रक संभाव्य असून परीक्षांच्या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या 23 ऑगस्टपर्यंत कळवण्याचं आवाहनही करण्यात आले आहे. (Probable Exam Schedule 2024-25)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक शिक्षण (HSC) मंडळाच्या वतीनं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाते. (Probable Exam Schedule 2024-25)
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. (Probable Exam Schedule 2024-25)
(हेही वाचा – ‘या’ प्राण्यांसाठी उभारणार प्रजनन केंद्र; CM Eknath Shinde यांनी दिले निर्देश)
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : मंगळवार, 11 फेब्रुवारी ते मंगळवार, 18 मार्च 2025
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार, 24 जानेवारी ते सोमवार, 10 फेब्रुवारी 2025
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा : शुक्रवार, 21 फेब्रुवारी ते सोमवार, 17 मार्च 2025
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : सोमवार, 3 फेब्रुवारी ते गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025
(हेही पाहा – पक्ष फोडण्याच्या स्पर्धेत शरद पवारांना गोल्ड मेडल मिळेल; Devendra Fadanvis यांचा टोला )
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community