महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या विविध पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 2023 पासून भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. एमपीएससीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा पद्धत बंद करुन वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब 2023 पासून करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. मात्र, नवी पद्धत 2025 पासून लागू करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर 2023 च्या परीक्षांचे वेळापत्रक एमपीएससीने जाहीर केले.
( हेही वाचा: ‘काही माणसं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबत’, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव अढळरावांना टोला )
संभाव्य तारखा
राज्यसेवा मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर आणि 9 ऑक्टोबर 2023 या 4 दिवशी होणार आहेत. तसेच या परीक्षांचा निकाल अंदाजे जानेवारी 2024 मध्ये लागणार असून, याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क, सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 च्या अंतर्गत 10 पदांसाठी जानेवारी 2023 मध्ये जाहिरात निघणार असून, 30 एप्रिल रोजी परीक्षा होण्याची शक्यता आहे.