युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट खडतर

145

युक्रेनहून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी भारतातील वैद्यकीय विद्यापीठांत सामावून घेणे अशक्य असल्याचे नाशिकच्या कुलगुरु व लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, युक्रेन आणि भारतातील अभ्यासक्रम अगदीच भिन्न आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सामावून घेणे अशक्य आहे.

युक्रेन आणि भारतातील अभ्यासक्रमात खूप फरक

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना भारतात पुढील शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी युक्रेनमधील वैद्यकीय अभ्यासक्रम आणि त्या पद्धतीची माहिती घेतली गेली. तेथे विद्यार्थ्यांना पाठवणाऱ्या मध्यस्थांशी चर्चा करण्यात आली. यावेळी युक्रेन आणि भारतातील अभ्यासक्रमात खूपच फरक आढळला. दुसरीकडे भारतात नीटमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना येथे थेट सामावून घेणे अडचणीचे आहे. ही सर्व निरीक्षणे विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसमोर मांडली. या विद्यार्थ्यांना तेथील अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करणे शक्य आहे. परंतु  त्यांना तेथेच ही परीक्षा पुढे द्यावी लागेल.

( हेही वाचा: … तर हिंदू देवी-देवतांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई का नाही? न्यायालयानं ट्विटरवर व्यक्त केला संताप )

नीटची परीक्षा देऊनच प्रवेश

जर केंद्राने काही धोरणात्मक निर्णय घेतला तर त्यात बदल होऊ शकतो. युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असणा-या विद्यार्थ्यांना काहीही शिकवण्यात आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा देऊनच एमबीबीएसला प्रवेश घेता येणार असल्याचे कानिटकर यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.