वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; पुण्यातील चांदणी चौकात होणार सहापदरी मार्ग

पुण्यातील चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढील चाळीस वर्षांचा विचार करून महामार्गाची रुंदी वाढविली जात आहे. एनडीए-पाषाण पूल पाडल्यानंतर त्याखालील महामार्ग जवळपास ३६ मीटर रुंदीचा होणार आहे. सध्या या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणारी व मुंबईहून पुण्याला येणारी अशा दोन लेन आहेत. रुंदीकरणात मात्र पुण्याहून-मुंबईला जाण्यासाठी ३, तर मुंबईहून पुण्याला येण्यासाठी ३ अशा एकूण सहा लेन तयार होणार आहेत. त्यामुळे पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

( हेही वाचा : T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे Sold Out, ‘या’ तारखेला असणार महामुकाबला)

१८ सप्टेंबरला पूल पाडण्याचे नियोजन

पूल पाडल्यानंतर रस्त्याच्या कडेचे मोठे खडक फोडण्याचे काम वेगात होईल. १५ दिवसांत खडक फोडून या मार्गाची रुंदी वाढवली जाईल. दरम्यान, हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे पुढचे १५ दिवस या ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागणार आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एनडीए-पाषाण पूल पाडण्याचे काम सुरू आहे. या पुलावर ड्रिलिंग केले जात आहे. हे काम आणखी दोन दिवस चालेल. त्यानंतर त्यात विस्फोटक ठेवण्याचे व त्यासाठी वायरिंगचे काम केले जाणार आहे. १८ सप्टेंबरला पूल पाडण्याचे नियोजन असले तरी वेळेबाबत अद्याप कोणतीही निश्चिती नाही. पावसामुळे या कामांना थोडा उशीर होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here