Former Naval Officers Qatar : माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची ‘ही’ कार्यवाही

कतारमध्ये भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी भारताच्या बाजूने अपील दाखल करण्यात आले आहे. या सुनावणीचा निकाल गोपनीय ठेवण्यात आला आहे.

132
Former Naval Officers Qatar : माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची 'ही' कार्यवाही
Former Naval Officers Qatar : माजी नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची 'ही' कार्यवाही

कतारमध्ये भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Former Naval Officers Qatar) भारत सरकार याबाबत पावले उचलत आहे. भारतीय अधिकारी कतार प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. नुकतेच कतार सरकारने हेरगिरी प्रकरणात आठ भारतियांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

शासनाकडून शिक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. या संवेदनशील प्रकरणाबाबत भारताच्या बाजूने अपील दाखल करण्यात आले आहे. (Former Naval Officers Qatar)

(हेही वाचा – Ganesh Vandana : गणेशवंदनेविषयीची रोचक माहिती)

या सुनावणीचा निकाल गोपनीय ठेवण्यात आला आहे. हे कायदेशीर टीमसोबतही शेअर केले आहे. यासोबतच भारतानेही अपील दाखल केले आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबियांशीही संपर्क साधला आहे.

7 नोव्हेंबर रोजी त्यांना कॉन्सुलर ऍक्सेस मिळाला. आठही भारतियांना भेटलो आहोत आणि ही बाब अत्यंत संवेदनशील आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत सांगितले आहे. (Former Naval Officers Qatar)

ऑगस्ट 2022 मध्ये कतारने भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना ते कतारमधील एका कंपनीत काम करत असताना इस्रायलसाठी हेर म्हणून काम करत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे.

(हेही वाचा – Anirudh Brahmabhatta : आधुनिक गुजराती कवी आणि लेखक अनिरुद्ध ब्रह्मभट्ट)

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेन्दु तिवारी, कमांडर सुगुनकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आणि सेलर रागेश यांना कतारच्या गुप्तचर संस्थेने 30 ऑगस्ट 2022 रोजी दोहा येथून अटक केली होती.

कतारी अधिकाऱ्यांनी नौदलाच्या माजी सैनिकांचे जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळले होते. कतारच्या न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. त्यानंतर भारत या अधिकाऱ्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. (Former Naval Officers Qatar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.