देशभरात कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना आता राज्यातही वेगाने कोरोना पसरत आहे. यासाठीच सार्वजनिक आरोग्य विभागाने आधीचा टास्क फोर्स रद्द करून नवीन टास्क फोर्सची स्थापना केली आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधन करणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी असतील असे सांगितले जात आहे. (Corona Update)
२०२० च्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या थैमानाला सुरुवात झाली. त्यावेळी राज्य सरकारने डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला होता. कोरोनाच्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्सने मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आता नव्याने रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभागाने पुन्हा टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याचे काम सुरू केले आहे. आरोग्य विभागातील वारिष्ट आधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, या टास्क फोर्सच्या सदस्यपदी १७ पेक्षा आधिक सदस्य असण्याची शक्यता आहे. (Corona Update)
(हेही वाचा : Dadar Savarkar Market: दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईचे प्रवेशद्वार फेरीवाल्यांनी अडवले)
राज्यात ३५ तर मुंबईत १८ नवीन रुग्ण
राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या राज्यात १०३ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी राज्यात ३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबई १८ ,ठाणे पालिका क्षेत्र ४ , कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र १ , रायगड -१पनवेल १, पुणे पालिका क्षेत्र ६, सातारा २, सांगली १ , मिरज कुपवाड पालिका क्षेत्र १