Debries On Call : राडारोडा संकलनापासून ते १२०० मेट्रिक टनाच्या डेब्रिजवर प्रक्रिया

ऑनलाईन प्रणालीद्वारे महापालिकेच्यावतीने राबवलेला देशातील पहिला उपक्रम

367
Air Pollution : एका दिवसांत मुंबईतील १८९ राडारोडा महापालिकेने केला जमा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘डेब्रिज ऑन कॉल’ (Debries On Call) सेवेचा लोकाभिमुख विस्तार करताना महानगरपालिकेने पुढील तब्बल २० वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. दोन्ही कंत्राटदारांची एकत्रित सेवा लक्षात घेता, प्रतिदिन १२०० टन डेब्रिजवर प्रक्रिया होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील हा सर्वाधिक क्षमतेचा प्रकल्प ठरला आहे. या दोन्ही कंत्राटदारांची सेवा ४ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. राडारोडा संकलनापासून ते प्रक्रियेपर्यत ऑनलाईन प्रणालीद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने ही सेवा अधिक सुलभ, जलद होणार आहे. संपूर्ण भारतातील अशा प्रकारचा ‘ऑनलाईन’ सेवा असलेला हा पहिलाच उपक्रम आहे. तर प्रतिदिन १२०० टन प्रक्रिया ही क्षमता लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा हा प्रकल्प आहे.

(हेही वाचा – Datta Jayanti निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मुंबई आणि पालघर जिल्ह्यात एकूण ३८ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन)

मुंबई महानगरपालिकेवर प्रकल्प जागा, भांडवली गुंतवणूक, परिरक्षण व तत्सम भांडवली बाबींच्या खर्चाचा भार आलेला नाही. यामध्ये, मुंबई शहर (कुलाबा ते शीव) व पूर्व उपनगरांसाठी (कुर्ला ते मुलूंड) मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प हा शिळफाटा, डायघर गाव येथे पाच एकर जागेवर स्थित आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६०० टन प्रति दिन इतकी आहे. (Debries On Call)

तर पश्चिम उपनगरांसाठी (वांद्रे ते दहिसर) एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प हा दहिसर, कोकणीपाडा येथे पाच एकर जागेवर स्थित आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता ६०० टन प्रतिदिन इतकी आहे. राडारोडा संकलन, वाहतूक, त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, त्यासाठी जागा मिळवून प्रकल्प उभारणे, मनुष्यबळ व संयंत्रे इत्यादी यंत्रणा उभी करणे, या सर्व बाबींची जबाबदारी ही कंत्राटदारावरच सोपविण्यात आली आहे.

(हेही वाचा – BMC : मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मानधनाची रक्कम देणार की बुडवणार?)

पर्यावरणपूरक उपक्रम

‘डेब्रिज ऑन कॉल’ (Debries On Call) सेवेसाठी नियुक्त कंत्राटदारांच्या प्रकल्पांमध्ये राडारोडा नेल्यावर त्याठिकाणी डेब्रिजवर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल. त्यातून तयार होणारे वाळूसदृश्य घटक हे पेवर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड, बाक (बेंच) यासारख्या संरचनाविरहीत (नॉन स्ट्रक्चरल) बाबींच्या निर्मितीसाठी संबंधित उद्योगांना वापरात येऊ शकतील. ही जबाबदारी देखील संबंधित कंत्राटदारांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ही नवीन ‘डेब्रिज ऑन कॉल’ (Debries On Call) सेवा जशी लोकाभिमुख आहे, तशीच ती पर्यावरणपूरक देखील ठरणार आहे.

(हेही वाचा – Gas Leak: रत्नागिरीत विषारी वायूगळतीची मोठी दुर्घटना, ३० ते ४० विद्यार्थ्यांना बाधा  )

भारतातील पहिलाच प्रकल्प

विशेष म्हणजे, वर नमूद केलेल्या वैशिष्ट्यांसह ‘डेब्रिज ऑन कॉल’ (Debries On Call) सेवा असलेला भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यामध्ये राडारोडा संकलनापासून ते प्रक्रियेपर्यंत ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहे. स्वाभाविकच अशी सेवा पुरवणारी मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिलीच संस्था ठरली आहे.

नव्या स्वरुपात सुरु केलेली ‘डेब्रिज ऑन कॉल’ (Debries On Call) सेवा नुकतीच सुरु झालेली असून प्रारंभीचा कालावधी हा प्रायोगिक स्वरुपाचा आहे. नागरिकांना या सेवेमध्ये येणारे अनुभव लक्षात घेवून, त्यांच्या सूचना विचारात घेऊन त्यात अधिकाधिक सुधारणा करण्यात येतील, मुंबईकरांनी या ‘डेब्रिज ऑन कॉल’ (Debries On Call) सेवेला अधिकाधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (प्रभारी) किरण दिघावकर यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.