Kala Ghoda Festival : काळा घोडा महोत्सवात महानगरपालिकेच्या बचत गटांची उत्पादने

545
Kala Ghoda Festival : काळा घोडा महोत्सवात महानगरपालिकेच्या बचत गटांची उत्पादने
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कला महोत्सव सुरू झाला असून या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. या महोत्सवात मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या १८ बचत गटांनी सहभाग घेतला आहे. या काळा घोडा महोत्सवात सहभागी झालेल्या १८ बचत गटांनी फॅन्सी चप्पल, बॅग, गोधडी, लाकूड फेब्रिक ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, आभूषण या प्रकारच्या वस्तू विक्री करणारे दालन उभारले आहेत. (Kala Ghoda Festival)

कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुंबईतील काळा घोडा महोत्सव हा विशेषत्वाने ओळखला जातो. यंदा शनिवारी २५ जानेवारी २०२५ पासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवारी २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात मुंबईसह देशभरातील कलाकारांनी आपली कलादालने प्रदर्शित केली आहेत. महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठीही महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. (Kala Ghoda Festival)

(हेही वाचा – मस्साजोग प्रकरणी दोषींवर कारवाई होणारच; DCM Ajit Pawar यांची ठाम भूमिका)

याचाच एक भाग म्हणून काला घोडा महोत्सवातही महानगरपालिकेने या बचत गटांसाठी दालने (स्टॉल्स) उपलब्ध करून दिले आहेत. या महोत्सवात १८ बचत गट सहभागी झाले आहेत. त्यामध्ये बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, एल, एम पश्चिम, एन, एस, पी उत्तर, आर दक्षिण या प्रशासकीय विभागातील बचत गटांचा समावेश आहे. (Kala Ghoda Festival)

महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांनी निरनिराळ्या क्षेत्रात भरारी घेतली आहे. कापड व्यवसाय, आभूषणे, कापडी पिशव्या, खाद्यपदार्थ, गोधडी, शिल्पकला, महिलांसाठीच्या-कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग अशी निरनिराळी उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. काळा घोडा महोत्सवात सहभागी झालेल्या १८ बचत गटांनी महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेली विविध आभूषणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत. (Kala Ghoda Festival)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.