दिवाळीनंतर मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विशिष्ट कार्यक्रम वगळता 5 पेक्षा जास्त जणांच्या जमावावर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान हे निर्बंध लागू असणार आहेत, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहेत.
मुंबई पोलिसांचे आदेश
1 नोव्हेंबर रोजी रात्री 12 पासून 15 नोव्हेंबरपर्यंत निर्बंधांचे हे आदेश लागू करण्यात आले आहेत. विविध सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या अलर्टनंतर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या निर्णयानुसार 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी असणार आहे. 1 ते 15 नोव्हेंबर या काळात सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी असणार आहे. मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाहीतर कठोर कारवाई होणार
या आदेशात मात्र घरगुती कार्यक्रम,विवह सोहळे आणि अंत्यसंस्कारासारख्या धार्मिक कार्यांना सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांना देखील या आदेशात सूट देण्यात आली आहे. तसेच नाट्यगृहात देखील कार्यक्रमांना या आदेशांमधून सूट देण्यात आली आहे. या आदेशांचे पालन न करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community