Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 16 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्याकडून विशेष सूचना

192
Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 16 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू
Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 16 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

सण आणि शालेय परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मनाई आदेश लगू करण्यात आला आहे. यासाठी ठाणे पोलीस आयक्तालयाच्या हद्दीत जीवित आणि वित्त होऊ नये, याकरिता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 2 ते 16 सप्टेंबर 2023 या कालावधीत ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्याकडून हे आदेश देण्यात आले आहेत.

या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे,वाद्य वाजविणे, कोणत्याही व्यक्तिच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा नेत्यांच्या चित्र, प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे, सभ्यता आणि नितीमत्ता यांना धोका पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना या कालावधीत मनाई आहे.

(हेही वाचा  –IND vs PAK Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा खोडा, काही वेळेसाठी सामना थांबला )

या मनाई आदेशात सरकारी कर्मचारी किंवा ज्याला वरिष्ठांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगणे आवश्यक आहे त्यांना अधिकाऱ्यांकडून सूट देण्यात आलेली आहे. याशिवाय लग्न कार्यासाठी जमलेले लोक, प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी अथवा निमसरकारी कामासाठी न्यायालय, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका, सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाणांकरिता हा आदेश लागू राहणार नाही. हा मनाई आदेश दि. 02 सप्टेंबर 2023 रोजी 00.01 वाजेपासून दि. 16 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.