गेल्या काही दिवसांमध्ये लक्षद्वीपमध्ये फिरायला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मालदीवला जाण्यापेक्षा भारतातील पर्यटन स्थळ असलेल्या लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती मिळत आहे. लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी एका रेस्टॉरंटने एक मजेशीर ऑफर आणली आहे.
हिंदुस्तान आणि मालदीव यांच्यात राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा फटका मालदीवच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अशातच पर्यटक सुद्धा मालदीवला जाण्यापेक्षा लक्षद्वीपला जाणे पसंत करत आहेत. लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मालदीवला अद्दल घडवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या एका रेस्टॉरंटने एक ऑफर आणली आहे. #boycottmaldives या अभियानात सहभागी होत नोएडा आणि गाजियाबाद मधील मिस्टर भटूरा (Mr. भटूरा) या रेस्टॉरंटने छोले भटूरेची एक प्लेट मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे.
(हेही वाचा – Narendra Modi: जमिनीवर झोपणे, आहारात फक्त नारळपाणी, कसे सुरू आहे पंतप्रधान मोदींचे अनुष्ठान; वाचा सविस्तर )
मोफत छोले भटूरे खा…
ही ऑफर भारताततील सर्व नागरिकांसाठी खुली असणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला लक्षद्वीपची ट्रिप बुक केलेली असेल किंवा मालदीवची ट्रीप रद्द केली असेल, तरच तुम्हाला मोफत छोले भटूरे खाण्याचा अस्वाद घेता येणार आहे.
लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना
रेस्टॉरंटचे मालक विजय मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना द्यायची आहे. या ऑफरला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही ऑफर सुरू ठेवण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community